Tunisha Sharma Kangana Ranaut Esakal
मनोरंजन

Tunisha Sharma: तिच्या हत्येसाठी शीझानच जबाबदार..कंगणा भडकली, पंतप्रधानाकडे केली मागणी...

सकाळ डिजिटल टीम

तुनिषा शर्मानं वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी आपलं आयुष्य संपवत या जगाचा निरोप घेतला. तुनिषानं २४ डिसेंबर रोजी आपल्या मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिली.

आता कंगना राणौतने इंस्टाग्रामवर ३ पानांची नोट लिहित स्टोरी टाकली आहे. यासोबतच तिने तुनिषा शर्माच्या मृत्यूवरही आपली प्रतिक्रिया दिली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदा करण्याची विनंतीही तिने मोदी सरकारकडे केली आहे.

तिने लिहिले की, 'स्त्री सर्व काही सहन करू शकते, मग ते प्रेमपासून वेगळं होणं असो किंवा लग्न तुटणे असो, नातेसंबंध किंवा इतर काहीही असो पण ती छळ सहन करू शकत नाही. तिच्या स्टोरीमध्ये प्रेम नव्हतंच ही गोष्ट ती स्वीकारू शकत नाही. समोरच्या व्यक्तीसाठी तिचं प्रेम आणि असुरक्षितता हे तिचं शोषण करण्यासाठी पुरेसं होतं. तिचं प्रेम होतं, तर समोरच्याला फक्त तिचा शारीरिक आणि भावनिक वापर करायचा होता.” असं म्हणंत तिने शिझानवर आरोप केले आहेत.

तिला हे जेव्हा कळालं तेव्हा ती खचली आणि तिने जर तिचं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला असेल, तर ते तिने एकटीने केलेलं नाही, हा खून आहे. असं कंगणाला वाटतंय

कंगना रनोटने पुढे लिहिले की, 'मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करतो की, ज्याप्रमाणे कृष्ण द्रौपदीसाठी उभा राहिला, तसा राम सीतेसाठी उभा राहिला. तसेच बहुपत्नीत्वाच्या विरोधात कठोर कायदे करा. अॅसिड हल्ला करणाऱ्यांविरोधात कायदा करा. त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे.

Also Read - क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

तुनिषा शर्मानं आत्महत्या केली त्यासाठी शीझान खानला जबाबदार ठरवलं जात आहे. तुनिषाच्या आईनं शीझान खानवर गंभीर आरोप केलेयत. तुनिषाच्या आईचं म्हणणं आहे की शीझाननं त्यांच्या मुलीचा विश्वासघात केला होता.

शीझानचे अनेक मुलींसोबत संबंध होतं. शीझाननं त्या कारणानं तुनिषाला सोडलं होतं. आणि यामुळेच तुनिषानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.असे गंभीर आरोप केले होते, त्यातच आता कंगणाच्या या वक्तव्याने पुन्हा सोशल मिडियावर चर्चांना उधान आलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT