Kangana Ranaut, Aamir Khan, Hrithik Roshan Esakal
मनोरंजन

Kangana Ranaut: कोणीच नाही उरलं तर आता आमिर खानवर डागली कंगनानं तोफ.. म्हणाली, 'हृतिकच्या केसनंतर यानेही मला..'

कंगना रनौतनं यावेळी आपल्या इन्स्टा स्टोरीत आमिर खानला मित्र म्हणत टार्गेट केलं आहे.

प्रणाली मोरे

Kangana Ranut: अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच बॉलीवूडवर हे आरोप करत आलीय की हृतिक रोशनच्या केसनंतर तिला सगळ्यांनी एकटं पाडलं होतं. कंगना रनौत याआधीच करण जोहरवर नेपोटिझमचा आरोप लावून मोकळी झालीय. तर शाहरुख,सलमान आणि आमिर खानविषयी तिखट प्रतिक्रिया देऊनही मोकळी झाली आहे. हो,एक काळ होता जेव्हा आमिर खान कंगना रनौतचा अभिनय आणि तिच्या विचार करण्याच्या प्रवृत्तीची खूप प्रशंसा करायचा. आता बऱ्याच दिवसांनी कंगनाला आपले जुने दिवस आणि आमिर खानची मैत्री आठवतेय.

कंगना रनौतनं आपल्या इन्स्टाग्राम व्हिडीओत याविषयी शेअर केलं आहे. ज्यामध्ये ती आमिर खानचा शो 'सत्यमेव जयते' मध्ये गेली होती. ज्यावेळी कंगनानं सिनेमातील आयटम सॉंग आणि त्यांच्या स्टेप्सविषयी बातचीत केली आहे.

कंगना म्हणाली आहे,''सिनेमात जे अश्लील आयटम सॉंग दाखवले जातात त्याच्यावर एकदा एक मुलगी रिहर्सल करत होती. त्या स्टेप्स ती करताना क्यूट वाटत होती पण मी विचार करत होते की या अशा गाण्यावर ताल धरताना हिची मानसिकत तशी होऊ नये..कारण जेव्हा तिला कळेल की मी असे काहीतरी विचित्र हावभाव करुन नाचले की याची प्रशंसा होतेय..तर असंच करायला हवं असं तिला वाटेल''.(Kangana ranaut says aamir khan supoort her before hrithik roshan case)

कंगनानं या व्हिडीओसोबत आमिर खानसाठी एक मेसेज देखील शेअर केला आहे. कंगनानं लिहिलं आहे-''मला देखील कधी-कधी ते दिवस आठवतात जेव्हा आमिर सर माझे चांगले मित्र होते. कुठे गेले ते दिवस..''

कंगनानं पुढे लिहिलं आहे-''एक गोष्ट मात्र पक्की आहे की आमिर सरांनी मला मेंटोर केलं आहे. त्यांनी माझी प्रशंसा केली आणि हृतिकच्या केसआधी त्यांना माझ्या बऱ्याच गोष्टी आवडायच्या. ते मला खूप गोष्टींबाबत मार्गदर्शन करायचे. पण त्या केसनंतर त्यांनी आपला पाठिंबा स्पष्ट केला. आणि एका महिलेविरोधात संपूर्ण इंडस्ट्री उभी राहिली''.

तुम्हाला माहितीसाठी इथे सांगतो की हृतिक रोशन आणि कंगना रनौतनं 'क्रिश ३' आणि 'काइट्स' मध्ये एकत्र काम केलं होतं. 'क्रिश ३' च्या शूटिंग दरम्यान हृतिक आणि कंगनाच्या अफेअरच्या खूप अफवा उठल्या होत्या.

त्यानंतर 'आशिकी 2' मध्ये हृतिक आणि कंगनाला कास्ट करण्याची गोष्ट समोर आली होती पण हृतिकनं कंगनाला सिनेमात घेण्यासाठी नकार दिला. आणि इथूनच दोघांमध्ये वाद सुरू झाला होता.

कंगनाने हृतिक आणि आपल्या रिलेशनशीपविषयी जे जाहिरपणे सांगितलं होतं त्याला हृतिकनं स्पष्ट खोटं म्हणत नाकारलं होतं. त्यानंतर कंगनानं काही मेल्स शेअर केले होते आणि एका मुलाखतीत हृतिकला आपला एक्स बॉयफ्रेंड म्हणत खूप काही बोलून गेली होती.

हृतिकनं यानंतर कंगनाला कायदेशीर नोटिस पाठवली होती. जेव्हा कंगनानं याचं उत्तर दिलं नाही तेव्हा त्यानं कंगना विरोधात केस ठोकली होती. कंगनानं देखील हृतिक विरोधात केस दाखल केली होती आणि अजूनही ती केस सुरूच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय मंत्री तर बावनकुळे मुख्यमंत्री? स्वत: मंत्री बावनकुळेंनींच दिलं स्पष्टीकरण

NGO साठी सुवर्णसंधी! HCL Foundation देणार 24 कोटी रुपयांचे अनुदान; अर्ज प्रक्रिया सुरू, पाहा सविस्तर

Horoscope : उद्या बनतोय दुर्मिळ दशकीर्ती योग! 'या' 5 राशी होणार मालमाल; करिअर-व्यवसायात भरभराट, आरोग्याची मोठी समस्या होणार दूर

शाहरुखने खरेदी केलं दिल्लीतील 'ते' घर, जिथं किंग खानने गौरीसोबत अनुभवला स्ट्रगल काळ, कोट्यवधींमध्ये झाली डील

Latest Marathi News Update : फिरोज शेख यांचे मेहुणे अन्वर खाजा बाऊददीन यांनी आरोप फेटाळले

SCROLL FOR NEXT