Kangana Ranaut Post Esakal
मनोरंजन

Kangana Ranaut Post: कुणाचं काही ऐकु नका, माझ्या चित्रपटाला नावं ठेवू नका! कंगणाची पोस्ट व्हायरल

Vaishali Patil

Kangana Ranaut Post on Tiku Weds Sheru: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर स्टारर चित्रपट ' टिकू वेड्स शेरू' आज रिलीज झाला आहे. बॉलिवूडची पंगा क्विन कंगना रणौत या चित्रपाटातुन निर्मिती म्हणुन एंट्री करत आहे.

सध्या या चित्रपटाची सोशल मिडियावर चर्चा होत आहे. दोन्ही कलाकरांच्या वयाच्या अतंरामुळे या चित्रपटाला ट्रोलही करण्यात आलं. मात्र नवाज आणि अवनीतसोबत कंगना राणौतनेही या चित्रपटाचे भरपूर प्रमोशन केले आहे.

आता हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याला लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. दरम्यान कंगना राणौतने एकदा पुन्हा असा काही दावा केला आहे की त्यामुळे चर्चा सुरु झाल्या आहेत.

कंगनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात तिने संताप व्यक्त केला आहे. तिने या पोस्टमध्ये लिहिलयं की, 'लोक मला मॅसेज करतआहे की त्यांना हा चित्रपट खूप आवडत आहे.

चित्रपटातील सर्व कविता मी लिहिल्या आहेत आणि चित्रपट माफिया चित्रपटाचे नुकसान करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते फेक रिव्ह्यू देत आहे. त्यांनी चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच त्याविरोधात मोहीम सुरू केली होती.'

या पोस्टमध्ये पुढे ती म्हणते की, 'मी माझ्या चाहत्यांना विनंती करते की कोणत्याही खोट्या रिव्ह्यूवर विश्वास ठेवु नका. चित्रपट अमेझॉन प्राइमवर स्ट्रीम होत आहे. स्वतः पहा किंवा फक्त तुमच्या मित्रांकडून या चित्रपटाबद्दल रिव्हू घ्या. तुम्ही सिनेमा पाहिल्यानंतर नक्की तुमचा रिव्ह्यू द्या..'

अवनीत कौर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. हा चित्रपट एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे ज्यात दोन लोकांमधील वयातील अंतर आणि त्यांची कहानी सांगण्यात आली आहे . जे एकमेकांकडे आकर्षित होतात.

कंगना राणौतच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच तिच्या 'इमर्जन्सी' या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती साउथचा चंद्रमुखी 2 या चित्रपटातही दिसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT