Kangana Ranaut Video: Esakal
मनोरंजन

Kangana Ranaut Video:कंगना अन् सलमानचा एकत्र चित्रपट! 'त्या' व्हिडिओनंतर नेटकऱ्यांचा कंगनाकडे हट्ट..

Vaishali Patil

Kangana Ranaut Video: बॉलिवूडची पंगा क्विन म्हणुन ओळख असलेली कंगना रणौत हिची वेगळी ओळख सांगायची गरज नाही. कारण ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कंगना सोशल मिडियावर कमालीची सक्रिय आहे.

ती तिचं मत मांडते मग ते कुणाला आवडणारे असो किंवा कुणाला टोचणारे. ती सोशल मीडियावर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींवर तिचा राग व्यक्त करत असते.

मात्र ती कधीही बॉलिवूडचा भाईजान सलमान खानसोबत पंगा घेत नाही. कंगना सलमानच्या टीव्ही शो 'दस का दम'मध्ये दिसलेल्या अभिनेत्रींपैकी ती एक आहे.

कंगनाने नुकताच या शोशी संबंधित एक व्हिडिओ शेअर केला होता जो तिच्या एका चाहत्याने सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

या व्हिडीओ पाहिल्यानंतर कंगनाने जुन्या आठवणींमध्ये रमलेली दिसली.

कंगना रणौतच्या एका फॅन पेजने व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री 'दस का दम'च्या सेटवर सलमान खानसोबत आहे.

हा खुपच फनी व्हिडिओ आहे. ज्यात कंगना ही माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांच्या 'धक धक करने लगा' या लोकप्रिय गाण्यावर डान्स करताना दिसली आहे.

या गाण्यात तिने घाघरा चोली घातली होती, या लूकसाठी सलमानने तिची प्रशंसा करत म्हणतो की, 'तू अप्रतिम दिसत आहेस.'

कंगनाही त्यावर परफॉर्म करते आणि सलमानही टाळ्या वाजवून तिला चिअर करतो. या व्हिडिओने कंगनाला जूणे दिवस आठवले.

तिने हा व्हिडिओ शेयर करत इंस्टाग्राम स्टोरीवर सलमानला टॅग करत लिहिले, 'OMG!!! SK आपण इतके तरुण का दिसतो?? याचा अर्थ आपण आता नाही आहोत का?' यानंतर तिने काही हसणारे शेयर केले आहेत.

त्याचवेळी त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले,OMG दोघं, अनेकांनी तर लिहिलं की, आम्हाला दोघांनाही चित्रपटात एकत्र पाहायचं आहे.

आणखी एकाने लिहिलं की, बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर अभिनेता आणि अभिनेत्री, दोघांनी एकत्र रोमँटिक कॉमेडी चित्रपट करावा.

कंगनाने यापूर्वीही तिच्या मुलाखतींमध्ये सलमान खानला तिचा चांगला मित्र म्हणाली होती.

कंगना राणौतच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच तिच्या 'इमर्जन्सी' या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती साउथचा चंद्रमुखी 2 या चित्रपटातही दिसेल.

तर दुसरीकडे, सलमान सध्या टायगरच्या तिसऱ्या भागाचे शूटिंग करत आहे. याशिवाय त्याच्याकडे टायगर vs पठाणही आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT