Actress Kangana news Team esakal
मनोरंजन

सुंभ जळला तरी पिळ काही जात नाही, 'ती' पुन्हा बोलली....

राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर ती बोलत आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - अभिनेत्री कंगणाची ( Kangana Ranaut) टिवटिव सगळ्यांना माहिती आहे. तिच्या वाचाळपणाबद्दल ती प्रसिध्द आहे. तिनं गेल्या काही दिवसांपूर्वी जी वादग्रस्त वक्तव्यं केली होती त्यामुळे ती चर्चेत आली होती. व्टिटरनं तिचे अकाऊंट सस्पेंड केलं आहे. त्याला कारणही तसचं आहे. पश्चिम बंगालमध्ये (West bengal election) निवडणूकांच्या निकालानंतर जो गोंधळ उडाला त्यात कंगणानं काही धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्यं केली होती. तिच्या त्या चिथावणीखोर स्वभावामुळे तिचं व्टिटरच्या (Twitter account suspended) अकाऊंटला बंद करण्यात आले होते. मात्र असे होऊनही ती गप्प बसलेली नाही.

कंगणासाठी ( Kangana Ranaut) कुठलाही विषय वर्ज्य नाही. सतत वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत राहणे तिला जमले आहे. त्यामुळे बातमीचा विषय कंगणाभोवतीच असतो. ती कुणावरही बोलत असते. राजकीय नेते, बॉलीवूड सेलिब्रेटी यांच्यावर ती टीका करत असते. तिला ते आवडते. आणि वादाचा सामना ती व्टिटच्या माध्यमातून करत असते. दिल्लीतील शेतक-यांच्या आंदोलनाच्या वेळी तिनं घेतलेली भूमिका सर्वांना माहिती आहे. त्यामुळे ती सर्वांच्या टीकेचा विषयही झाली होती. मात्र त्याचा काही एक परिणाम कंगणावर होत नाही.

actress kangana post

राजकीय वेगवेगळ्या मुद्द्यांवर बोलत राहणे कंगणाला जमतं. (politically and religion issue) अजूनही कंगणा वेगवेगळ्या सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर ती बोलत आहे. व्टिटरनंतर तिनं इंस्टावर आपली मतं मांडण्यास सुरुवात केली आहे. तिनं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविषयी एक प्रतिक्रिया दिली आहे. कंगणानं जो फोटो इंस्टावर पोस्ट केला आहे त्यात टीएससीचा एक नेता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आशीर्वाद घेताना दिसत आहे. तिनं त्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, राक्षसी ताडका, सत्तेच्या चरणी नतमस्तक. कंगणाची ही पोस्ट वेगानं व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs RCB WPL: 0,0,0,0,0,0,0,0,0,0,1,0! १२ चेंडूंत ११ निर्धाव! lauren bell ने दिला मुंबई इंडियन्सला जबर धाव; विकेटही घेतली अन्...

Pune News : एआय आणि डेटाच्या बळावर महाराष्ट्र होणार 'इनोव्हेशन हब'; डॉ. श्रीकांत पाटील यांनी मांडला रोडमॅप!

Latest Marathi News Live Update : भाजपचं हिंदुत्व हे चुनावी हिंदुत्व आहे का? - उद्धव ठाकरेंचा सवाल

Ayodhya Non-veg Ban: मोठी बातमी! अयोध्येत मांसाहारी पदार्थांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी; उल्लंघन केल्यास..., का निर्णय घेतला?

Chandrapur Kidney Racket Case : ''निवडणुकीच्या कामाच्या व्यस्त असल्याने भेटीला येऊ शकलो नाही'', किडनी पीडितांना भेटताच पालकमंत्र्यांचं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT