kangana on kareena 
मनोरंजन

कंगनाच्या टीमने आता घेतला बेबो करिनासोबत पंगा, पाहा व्हिडिओ

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- अभिनेत्री कंगना रनौतची डिजीटल टीम सोशल मिडिया अकाऊंटवरुन सतत काहीना काही ट्विट करत चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून या अकाऊंटवरुन अनेक धक्कादायक खुलासे ट्विट करुन सांगितले आहेत. आता तर कंगनाच्या टीमने थेट बॉलीवूड बेबो करिना कपूर खानसोबत पंगा घेतला आहे. त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये करिना कपूर आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या हुशारीची तुलना केली गेली आहे.

कंगनाच्या टीमने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये दोन बाजुला २ व्हिडिओ आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये सुशांत सिंह राजपूत त्याची दुर्बिण दाखवत आहे आणि सांगत आहे की तो यातून अंतराळात काय काय बघतो ते. तर दुस-या व्हिडिओमध्ये करिना कपूर दिसतेय ज्यामध्ये तिला मंगलयानाविषयी पत्रकाराने प्रश्न विचारला असता ती काहीच उत्तर देऊ शकत नाही. कारण तिला याविषयी काहीच माहिती नसते. हा व्हिडिओ कंगनाच्या टीमने रिट्विट केला आहे. ओरिजनल व्हिडिओच्या ट्विटमध्ये 'तुमचे हिरो सावधरित्या निवडा' असं कॅप्शन दिलं गेलं आहे. तसंच सुशांतच्या व्हिडिओखाली खरं टॅलेंट असं लिहून आणि करिनाच्या व्हिडिओखाली घराणेशाही असं लिहून यांच्या अभ्यासाची तुलना केली गेली आहे.

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर कंगना रनौत सतत बॉलीवूडमधील घराणेशाही आणि मक्तेदारी बद्दल बोलताना दिसतेय. तिचं म्हणणं आहे की बॉलीवूडमधील मुव्ही माफिया बाहेरुन आलेल्या कलाकारांना त्रास देतात आणि सुशांत देखील याचाच शिकार झाला आहे.

नुकतंच एका मुलाखतीमध्ये कंगनाने आदित्य चोप्रा, करण जोहर आणि महेश भट्ट यांच्यावर देखील धक्कायदायक आरोप लावले आहेत. याआधीही कंगनाने करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये करण घराणेशाहीचा प्रोत्साहन देत असल्याचं म्हटलं होतं.     

kangana ranaut team shares an old video of kareena kapoor khan  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC Quota Conflict: मराठा आरक्षण मूळ ओबीसींच आरक्षण कसं खाणार...? पुढच्या १० वर्षात भीषण परिस्थिती, अभ्यासक काय म्हणतात?

Latest Marathi News Updates : चामोर्शी-मूल, आष्टी, घोट मार्ग दुरुस्तीसाठी तात्काळ निधी मंजूर करण्याची मागणी

मनपा निवडणुकीपूर्वी मनसेला मोठा धक्का! प्रकाश महाजन यांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र', कारण काय?

Aurangzeb Poster Incident : औरंगजेबाच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक; अकोल्यात तणावाचं वातावरण, आठ ते दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

तुळजाभवानी देवीचं व्हीआयपी दर्शन होणार महाग, २० सप्टेंबरपासून पासचे नवे दर लागू, नवरात्रोत्सवाआधी मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT