kangana ranaut tejas special screening to defence minister rajnath singh and air force officer  SAKAL
मनोरंजन

Kangana Ranaut Tejas: दिल्लीमध्ये कंगनाच्या 'तेजस'ची स्पेशल स्क्रीनींग, संरक्षण मंत्रींसह वायुसेनाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती

कंगनाचा तेजस सिनेमा वायुसेनाच्या अधिकाऱ्यांनी पाहिला

Devendra Jadhav

कंगना रणौतच्या आगामी तेजस सिनेमाची सगळ्यांना उत्सुकता आहे. भारतीय वायु सेना दिनानिमित्त काही दिवसांपुर्वी सिनेमाचा ट्रेलर भेटीला आला. तेव्हापासुन कंगनाच्या तेजसची सर्वांना उत्सुकता आहे.

तेजस अवघ्या काहीच दिवसात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच कंगनाने तेजसचं विशेष स्क्रीनींग दिल्लीत आयोजित करण्यात आलं. यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि वायुसेनेचे अधिकारी उपस्थित होते.

(kangana ranaut tejas special screening to defence minister rajnath singh and air force officer)

शनिवारी दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भारतीय हवाई दलातील अनेक अधिकाऱ्यांसाठी तेजस चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते.

खुद्द कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. स्क्रिनिंगमधील काही फोटोंची मालिका कंगनाने शेअर केली आणि उपस्थित मान्यवरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. अभिनेत्रीने लिहिले, "टीम तेजसने आज संध्याकाळी आदरणीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जी आणि भारतीय वायुसेनेच्या अनेक मान्यवरांसाठी इंडियन एअर फोर्स ऑडिटोरियममध्ये विशेष स्क्रीनिंगचे आयोजन केले होते."

कंगना पुढे म्हणाली, "सैनिक आणि स्वत: माननीय संरक्षण मंत्री यांच्यासोबत संरक्षण दलांना समर्पित हा चित्रपट पाहणे हा एक रोमांचक अनुभव होता. चित्रपट पाहिल्यानंतर, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी त्यांच्या जॅकेटमधून त्यांचे फायटर जेटच्या आकाराचे ब्रोच काढले. माझे दिग्दर्शक सर्वेश मेवाडा यांना भेट म्हणून दिले."

RSVP निर्मित तेजस सिनेमात कंगना राणौत मुख्य भूमिकेत आहे. तेजस हा सर्वेश मेवाडा लिखित आणि दिग्दर्शित आणि रॉनी स्क्रूवाला निर्मित आहे. तेजस हा चित्रपट 27 ऑक्टोबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Adityanath Mobile Number: अधिकारी काम करत नाहीत? CM योगींकडे करा थेट तक्रार! मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा मोबाईल नंबर

Harbhajan Singh : रोहित शर्माला ODI कर्णधारपदावरून हटवल्याने हरभजन सिंग खवळला, शुभमन गिलबाबत म्हणाला...

Marathi Movie : तरूणाईला प्रेमाचा जादुई अनुभव देणारं ‘ये ना पुन्हा’ गाणं प्रदर्शित!

Ajit Agarkar: रोहित शर्मासाठी परतीचा प्रवास सुरू? कर्णधारपदावरून दूर करण्याची माहिती दिली होती,आगरकर

Kolhapur Bhishi Scam : विश्वासू मित्र म्हणून भिशी भरायला दिली, अन् ४० महिलांना पती, पत्नीने २५ लाखांना गंडवलं...; कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT