मनोरंजन

"राजकारणापासून दूर राहा नाहीतर..." ; कंगना पुन्हा सुरु, बॉलिवूडला दिली थेट धमकी!

सकाळ डिजिटल टीम

Kangana Ranaut : चित्रपटांपेक्षा राजकारणात चर्चेत असलेले नाव म्हणजे कंगना रणौत. कंगनाने दीड वर्षानंतर ट्विटरवर पुनरागमन केले. कंगनाने बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा चित्रपट पठाण व त्याच्या चाहत्यांवर टीका केली आहे. आज सकाळी पठाण चित्रपटाला लक्ष्य करत कंगनाने हिंदू धर्माचा नारा दिला आहे. यासोबतच बॉलिवूडला पुन्हा एकदा धमकी दिली आहे. 

शाहरुख खानच्या 'पठाण' २५ जानेवारीला प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत अनेक विक्रम मोडले आहेत. शाहरुखचे चाहते देखील आनंद साजरा करत आहेत. मात्र या चित्रपटाच्या निमित्ताने कंगनाने बॉलिवूडला टार्गेट केले आहे.

कंगनाने ट्विटरच्या माध्यमातून चांगली कामगिरी करणाऱ्या 'पठाण'च्या चाहत्यांना पुन्हा एकदा फटकारले आहे आणि 'राजकारण'पासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. कंगनाचे हे ट्विट धमकीसोबतच सल्लाही म्हणता येईल. 

'पठाण'च्या यशानंतर बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत आनंद व्यक्त करत आहेत. यासोबतच करण जोहर आणि आलिया भट्ट सारखे इंडस्ट्रीतील कलाकार आणि दिग्दर्शक या चित्रपटाच्या यशाला 'द्वेषावरचा विजय' म्हणत आहेत.

मात्र कंगनाला हे फारसे पटले नाही. कंगनाने बॉलिवूड आणि इंडस्ट्रीतील लोकांना इशारा दिला आहे. 'तुमच्या यशाचा आनंद घ्या' आणि 'राजकारणापासून दूर राहा' असे ट्विट कंगनाने केले .

कंगनाने ट्विट करून लिहिले की, "बॉलिवूडवाल्यांनो, तुम्ही या देशातील हिंदूंच्या द्वेषाने त्रस्त आहात, अशी कथा निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, जर मी 'द्वेषावर विजय' हे शब्द पुन्हा ऐकले, तर मी तुमचा आधी जसा क्लास घेत होती तसा क्लास पुन्हा घेईन. तुम्ही तुमच्या यशाचा आनंद घ्या आणि चांगले काम करा, राजकारणापासून दूर राहा."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला बसला दुसरा धक्का, कर्णधार केएल राहुलला हर्षित राणाने धाडलं माघारी

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT