chiranjivi sarja 
मनोरंजन

कन्नड अभिनेता चिरंजीवी सरजा याचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई ः  कन्नड अभिनेता चिरंजीवी सरजा याचे बंगळूर येथे एका खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 39 वर्षांचे होते. चिरंजीवीच्या छातीत दुखू लागल्याने तसेच श्वसनास त्रास होऊ लागल्याने ताबडतोब एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचाराला त्याने फारसा प्रतिसाद दिला नाही.

अखेर रविवारी दुपारी त्याने अंतिम श्वास घेतला.  त्याच्या स्वॅबचा नमुना कोरोना व्हायरस तपासणीसाठी पाठविला गेला आहे. ते चित्रपट अभिनेते अर्जुन सरजा यांचे पुतणे आणि ज्येष्ठ कन्नड अभिनेते शक्ती प्रसाद यांचे नातू आहेत. सन 2018 मध्ये त्याने अभिनेत्री मेघना राजशी लग्न केले आहे.

चिरंजीवीचा जन्म बंगळूरूमध्ये झाला होता. त्याने आपले शालेय शिक्षण बंगळूरच्या बाल्डविन बॉईज स्कूलमध्ये पूर्ण केले. बंगळूरच्या विजया कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. त्याने आपले काका अर्जुन सरजा यांच्याकडे जवळपास चार वर्षे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. चिरंजीवीने कन्नड चित्रपट वायुपुत्र या चित्रपटातून पदार्पण केले. तेव्हापासून त्याने 'चिररू', 'सिंहर्गा', 'अम्मा... आय लव यू' आणि 'आटगारा' यासह वीस हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचा आगामी 'राजा मार्थांडा' हा चित्रपट पोस्ट-प्रॉडक्शन टप्प्यात आहे आणि आणखी तीन चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! 'दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रसूतीनंतर दुसऱ्याच दिवशी महिलेचा मृत्यू'; तीन वर्षांनी डॉक्टरसह सेविकेवर गुन्हा

Latest Marathi News Updates : पुढील आठवड्यात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

Asia Cup 2025: UAE संघाला २७ चेंडूतच हरवल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला, 'आता पाकिस्तानविरुद्ध...'

Arunachal Pradesh: 'अरुणाचल प्रदेशात दुर्मीळ मांजरीचे दर्शन'; सुमारे ४,२०० मीटर उंचीवर अस्तित्व, जैवविविधतेवर शिक्कामोर्तब

अमेरिकेत १० वर्षात किती गोळीबाराच्या घटना घडल्या? प्रश्नावर उत्तर देताच थेट गळ्यावर झाडली गोळी; चार्ली किर्क यांची हत्या

SCROLL FOR NEXT