Kanpur court not allowed to shoot gangster film on vikas Dube
Kanpur court not allowed to shoot gangster film on vikas Dube  
मनोरंजन

'नो मिन्स नो',विकास दुबेवर आधारित चित्रपटाला नाकारली परवानगी

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  हल्ली एखाद्या गँगस्टरवर, गुंडावर, दहशतवाद्यावर 'बायोपिक' च्या नावाखाली चित्रपट तयार करण्याचा सोस अनेक मान्यवर निर्माते आणि दिग्दर्शक यांचा असतो. गेल्या काही वर्षांपासून बॉलीवूडनं कित्येक गुंड, दहशतवादी यांचे उदात्तीकरण केले आहे. त्यांच्या कुकर्माचा पाढा वाचण्यापेक्षा संबंधित व्यक्ती किती संघर्षातून पुढे गेला, परिस्थितीनं त्याला कसे बदलवले हे दाखविण्यावर भर दिला जातो. विकास दुबे कोण आहे, हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यानं केलेल्या गुन्ह्याचे स्वरुप पाहता आगामी काळात त्याच्यावर चित्रपट येणार असल्याचे भाकित काहींनी वर्तविले होते. त्याची तयारीही सुरु झाली होती. मात्र आता दुबेच्या आय़ुष्यावरील चित्रपटाच्या चित्रिकरणाला ब्रेक लागला आहे.

विकास दुबेची ओळख ही कानपुरचा गँगस्टर अशी म्हणावी लागेल. त्याच्या आयुष्यावर चित्रपट तयार करण्याचा मोह बॉलीवूडला झाला होता. त्यानुसार प्रसिध्द दिग्दर्शक नीरज चित्रपटासाठी परवानगी घ्यायला उत्तरप्रदेश न्यायालयात गेले होते. मात्र न्यायालयानं त्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. कानपूरचा गँगस्टर विकास दुबेच्या आयुष्यावर बेतलेल्या 'बिकरू कानपूर गँगस्टर' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला उत्तर प्रदेशात परवानगी मिळाली नाही. असं चित्रपटाचे सह-दिग्दर्शक नीरज सिंह यांनी दिली. त्याचं महत्वाचं कारण चित्रपटाचा विषय वादग्रस्त असल्याचे कारण त्यांना देण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शरद श्रीवास्तव करत आहेत. निमय बाली या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना नीरज म्हणाले, या चित्रपटाचा विषय वादग्रस्त असल्यानं आम्हाला ज्याठिकाणी शुटिंग करायचे आहे तिथे परवानगी नाकारण्यात आली. आम्ही चित्रपटाचे चित्रीकरण आग्रा आणि मथुरा येथे केले आहे. पुढील टप्प्यातील चित्रीकरणासाठी आम्ही कानपूरला गेलो पण आम्हाला परवानगी मिळाली नाही. यासंदर्भातील वादामुळे कानपूर विकास दुबेच्या नावाने ओळखले जाईल, अशी भीती व्यक्त केली गेली. या कारणामुळे आम्ही आता दुस-या शहरात चित्रपटाच्या चित्रीकरणाची योजना आखली आहे. 

विकास दुबे विषय़ी सांगायचे झाल्यास  तो उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड होता. 2 जुलै रोजी कानपूर येथे अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारात आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर 10 जुलै रोजी पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांचे एक विशेष पथक त्याला कानपूरला घेऊन जात होते. यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनाचा अपघात झाला.  पोलिसांवर हल्ला करत विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा झालेल्या चकमकीत पोलिसांनी विकास दुबेला मारले.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

Mumbai News: महाराष्ट्र दिनानिमित्त दादरसह परिसरातील वाहतुकीत बदल, वाचा महत्वाची बातमी 

Viral Video: रायफल्सच्या धाकाने ताब्यात घेत जाळली कार, वाचा न्यायाधीशाच्या अपहरण आणि सुटकेचा थरार

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT