Kantara Fame Rishabh Shetty on bollywood, Refuses to work in bollywood Google
मनोरंजन

Kantara: 'कांतारा'च्या ऋषभ शेट्टीनं तर बॉलीवूडची इज्जतच काढली; म्हणाला...

एका मुलाखतीत ऋषभ शेट्टीनं बॉलीवूड सिनेमे एकापाठी एक फ्लॉप होण्याचं कारण सांगत मोठा खुलासा केला आहे.

प्रणाली मोरे

Kantara: सध्या 'कांतारा' सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. कन्नड भाषेत बनलेल्या अन् हिंदीतही रिलीज झालेल्या या सिनेमानं बॉक्सऑफिसवर बंपर कमाई केली आहे. ऋषभ शेट्टीने 'कांतारा' विषयी म्हटलं होतं की, बॉलीवूडमध्ये माझ्या या सिनेमाचा रीमेक बनावा असं मला मुळीच वाटत नाही.आणि आता त्यानं जाहीर करुन टाकलं की,''बॉलीवूड म्हणजे काय आहे,मला तिथे कधीच काम करायचं नाही''. ऋषभ शेट्टीने हिंदी सिनेमात काम करण्याला नकार दिला आहे. (Kantara Fame Rishabh Shetty on bollywood, Refuses to work in bollywood)

हेही वाचा: बातम्या, टिप्सचा गुंतवणुकीवर नका होऊ देऊ परिणाम

ऋषभ शेट्टी कन्नड सिनेमांचा स्टार अभिनेता आहे आणि सुरुवातीपासून त्याने फक्त कन्नड सिनेमातच काम केले आहे. हिंदी मार्केटमध्ये जिथे लोकांना ऋषभ शेट्टीचं नाव देखील माहित नव्हतं तिथे लोक आता त्याला 'कांतारा' नावानं ओळखतात. बॉलीवूडमध्ये ऋषभ शेट्टी आणि 'कांतारा' सिनेमाची चर्चा जोरदार सुरु आहे.

ऋषभ शेट्टीनं एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की,''मला कन्नड सिनेमे करायचे आहेत. मी कानडी आहे याचा मला गर्व आहे. आज मी जिथे पोहोचलो आहे हे सगळं मी केलेले कन्नड सिनेमे आणि कन्नड भाषिक लोक यांच्यामुळे शक्य झालं. एक सिनेमा हिट झाल्यानं मी माझं कुटुंब आणि मित्रपरिवार बदलणार नाही. माझा आत्मा कन्नड सिनेमात वास करतो'.

ऋषभ शेट्टी आधी टॉलीवूडच्या अनेक अभिनेत्यांनी बॉलीवूडमध्ये काम करण्यास नकार दिला आहे. यामध्ये केजीएफ स्टार यश आणि तेलुगु सिनेमांचा सुपरस्टार महेश बाबू देखील सामिल आहेत. महेश बाबूने तर बॉलीवूडला आपली फी परवडणार नाही असं म्हटलं होतं.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ऋषभ शेट्टीने बॉलीवूड सिनेमे फ्लॉप का होतायत आणि बॉलीवूड कुठे चुकतंय यावर भाष्य केलं. तो म्हणाला की,''बॉलीवूडच्या निर्मात्यांवर हॉलीवूडचा प्रभाव हल्ली जास्त दिसून येत आहे''. ऋषभ शेट्टीच्या म्हणण्याप्रमाणे,निर्मात्यांना ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की ते सिनेमे प्रेक्षकांसाठी बनवत आहेत,स्वतःसाठी नाही. ऋषभ शेट्टी म्हणाला होता की बॉलीवूडच्या निर्माता-दिग्दर्शकांना अशा कथांमधले गुंफलेले सिनेमे लोकांसमोर आणायला हवेत जे त्यांच्या मातीतले असतील.

'कांतारा' १६ करोड बजेटमध्ये बनवला गेला आहे. ३० सप्टेंबरला रिलीज झालेला 'कांतारा' ऋषभ शेट्टीनं स्वतः लिहिला आहे आणि दिग्दर्शित केला आहे,तसंच त्यानं सिनेमात अभिनयही साकारला आहे. कांताराला रिलीज होऊन ४० दिवस झाले आहेत. आतापर्यंत सिनेमानं २७४.२४ करोडोंची कमाई केली आहे. IMDB वर कांतारानं अभिनेता यशच्या केजीएफ २ ला मागे टाकत देशात नंबर एकचं स्थान पटकावलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

'ही' मुस्लिम अभिनेत्री मन:शांतीसाठी वाचते हनुमान चालिसा, म्हणाली, 'मला गायत्री मंत्र खूप आवडतो, त्याने ऊर्जा जाणवते'

"माजोरडी उत्तरं..." हिंदी भाषा सक्तीच्या प्रश्नावर मराठी अभिनेत्याची पोस्ट; "अपेक्षा खरंच मोठी आहे का ?"

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

SCROLL FOR NEXT