Kantara Movie esakal
मनोरंजन

Kantara Movie : कांताराच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी! रिषभ शेट्टीचा खुलासा, आता...

ज्या चित्रपटानं भारतीय प्रेक्षकांना वेड लावलं त्या कांतारा चित्रपटाच्या निर्मात्यांनी मोठी घोषणा केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Kantara Movie : ज्या चित्रपटानं भारतीय प्रेक्षकांना वेड लावलं त्या कांतारा चित्रपटाच्या निर्मात्यांनी मोठी घोषणा केली आहे. तीनशे कोटींहून अधिक कमाई करत कांतारानं आपली वेगळी ओळख भारतीय चित्रपट विश्वामध्ये केली. आगळ्या वेगळ्या विषयाची प्रभावी मांडणी हे कांताराचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. आता एक रिषभनं केलेली घोषणा चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

होंबाळे फिल्म्सच्या 'कांतारा'ने आपल्या उत्कृष्ट कथानक आणि सीन्सने दर्शकांना जिंकून घेतले. केवळ 16 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 450 कोटींची कमाई करत आपलं वेगळेपण या चित्रपटानं सिद्ध केलं. तसेच, बॉलिवूड सेलिब्रिटींपासून जगातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी या चित्रपटाचे कौतुकही केले. इतकेच नाही तर 'कांतारा'हा 2022 चा धमाकेदार ब्लॉकबस्टर सिनेमा म्हणून उदयास येऊन वर्षातील सर्वात मोठा चित्रपट ठरला.

प्रेक्षक अजूनही 'कांतारा'बद्दल बोलत असताना, त्याच्या कौतूकात असताना दुसरी एक बातमी समोर आली आहे. चित्रपटाच्या सिक्वेलच्या अफवांमुळे प्रेक्षकांची उत्कंठा आणखी वाढली आहे. सिनेमाला मिळालेल्या उदंड यशानंतर, प्रेक्षक याच्या सिक्वेलच्या घोषणेची वाट पाहत असतानाच, निर्मात्यांनी आता अखेर चित्रपटाच्या प्रीक्वेलची घोषणा केली आहे.

नुकतेच कांताराने 100 दिवस पूर्ण केले असून, या क्षणाचा आनंद घेत चित्रपटाच्या टीमने सेलिब्रेशन केले. या खास प्रसंगी चित्रपटाचे लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांनी 'कांतारा'च्या सिक्वेलबद्दल खुलासा केला आणि म्हणाले, "आम्ही प्रेक्षकांचे खूप आभारी आहोत. त्यांच्या प्रतिसादामुळे हे सगळे शक्य झाले. या चित्रपटाने यशस्वीरित्या 100 दिवस पूर्ण केले आहेत. अशातच, या विशेष प्रसंगी मी 'कांतारा'च्या प्रीक्वेलची घोषणा करत आहे.

तुम्ही पाहिलेला पार्ट 2 आहे, पार्ट 1 पुढील वर्षी येईल. 'कांतारा' चित्रपटाचे शूटिंग करत असताना ही कल्पना माझ्या मनात आली. कारण कांताराचा इतिहास अधिक खोल आहे. तसेच, या सिनेमाच्या लिखाणावरही आम्ही काम करत आहोत. 'कांतारा'च्या प्रीक्वेलची निर्मिती होंबाळे फिल्म्स अंतर्गत विजय किरागंदुर आणि चालुवे गौडाद्वारा होणार असून, या चित्रपटात ऋषभ शेट्टी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात पुन्हा मोठा बदल! कमोडिटी बाजारात सोनं आणखी स्वस्त; जाणून घ्या आजचे ताजे भाव

EVM Controversy: भारताच्या इतिहासात प्रथमच होणार ईव्हीएमची तपासणी, मुंबई हायकोर्टाची परवानगी! शिंदे गटाचा 'हा' आमदार अडचणीत?

inspirational Story: भंगाराच्या हातगाडीपासून सुवर्णपदकापर्यंत झेप; कष्टकरी पित्याच्या दीपक बेनकरची जिद्द, संगमनेरच्या मातीतून उगवलेला मल्लखांबपटू!

Ladki Bahin Scheme Fraud : KYC च्या नावाखाली महिलांच्या इभ्रतीवर घाला! 'लाडकी बहीण' योजनेच्या केवायसीसाठी चक्क शरीरसुखाची मागणी; दोन नराधमांवर गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : अमित शहा आज कोलकातामध्ये भाजपचा पश्चिम बंगाल जाहीरनामा प्रकाशित करणार

SCROLL FOR NEXT