Kapil Sharma ask Gaur Gopal das if he ever fell in love..wathch video Google
मनोरंजन

Kapil Sharma: 'कधी प्रेमात पडला आहात?'... कपिलच्या प्रश्नावर काय म्हणाले गौर गोपाल दास?, पहा व्हिडीओ

कपिल शर्मा शो चा नवीन प्रोमो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मोटीवेशनल स्पीकर गौर गोपाल दास यांनी कपिलच्या गुगलीवर मारलेला सिक्सर चर्चेत आहे.

प्रणाली मोरे

Kapil Sharma: कपिल शर्माच्या शो मध्ये गौर गोपाल दास हे मोटिवेशनल स्पीकर्स आणि ९० च्या दशकातले गायक लवकरच धमाल करताना दिसणार आहेत. शो चा प्रोमो रिलीज झाला आहे. यामध्ये कपिल शर्मा गौर गोपाल दास यांना विचारताना दिसणार आहे की त्यांनी आयुष्यात कधी प्रेम केलं होतं का?

तर गायिका श्वेता शेट्टीनं देखील या कार्यक्रमात आधीच्या काळातील आणि आताच्या काळातील चाहत्यांमध्ये काय अंतर आहे हे सांगितलं. कपिलनं आपल्या कार्यक्रमात हजेरी लावलेल्या सर्वच पाहुण्यांची जबरदस्त छेड काढली आहे. (Kapil Sharma ask Gaur Gopal das if he ever fell in love..wathch video)

कपिल प्रोमो व्हिडीओत बोलताना दिसत आहे, ''मी मागे गौर गोपाल दास सरांचा एक व्हिडीओ पाहिला ज्यात ते गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड विषयी बोलत होते. सर माफ करा..पण कधी प्रेमात पडलाही होतात की फक्त या विषयांवर बोलता तुम्ही?'' यावर कपिल आज तू बोलण्याचं खूपच स्वातंत्र्य उपभोगतोयस असा टोला गौर गोपाल दास यांनी देखील लगावला.

यानंतर कपिल शर्मानं अलताफ रजा यांच्यासोबत देखील मजा-मस्करी केली. तो म्हणाला,''अल्ताफ भाई किती चमकता आहात तुम्ही? असं वाटत आहे की पाण्यात भिजवून ठेवलेलं आणि आता आता काढलंय पाण्यातून''. यानंतर पाहुणे म्हणून आलेल्या खान सर यांची मस्करी करताना कपिल म्हणतो की खान सर तुमच्या फॉलोअर्स मध्ये रविना टंडनही आहे.

यानंतर कपिल श्वेता शेट्टीला विचारताना दिसतो की,''तुमच्या पाठी कधी क्रेझी फॅन्स पडला होता का?'' यावर उत्तर देताा श्वेता शेट्टी म्हणाली, ''पहिले चाहते आजच्यासारखे नव्हते. खूप लाजाळू आणि सज्जन होते''. असा एकंदरीत हा एपिसोड खूपच मजेदार असणार आहे. आता प्रोमो पाहून चाहत्यांना वेध लागलेयत ते गौर गोपाल दास यांचे कपिलच्या खट्याळ प्रश्नावरील उत्तर ऐकण्याचे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

Gas Cylinder Shortage : मोठा काळाबाजार! चाकणला कमर्शियल वापराचा गॅस सहा हजार रुपयाला

पुलाचा एक मार्ग सुरू करण्याची घाई ११ जणांच्या जीवावर, प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे बळी; मुरबाडवर शोककळा

Jalgaon Temperature : जळगावसह जिल्ह्याचा पारा पोहोचला ४१ अंशांवर; रस्‍त्‍यांवर दुपारी शुकशुकाट

Legendary Singer Asha Bhosale : आशाताईंनी अर्धवट सोडला होता 'शो', भावासाठी ओढवून घेतलं होतं 'धर्मसंकट'; IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटलांनी जागवल्या आठवणी!

SCROLL FOR NEXT