कपिल शर्मा शो (Kapil Sharma Show) हा एक फॅमिली शो आहे. पण कधी कधी उत्साहाच्या भरात तो असं काही बोलून जातो की गमतीतही केलेल्या विनोदाची पातळी जरा खालीच जाते. पण तरिही आजपर्यंत या शो चा टीआरपी कधी कमी झालेला दिसला नाही. आता सध्या 'व्हॅलेंटाईन डे' (Valentine's Day) नजदीक आल्यानं सर्वत्र प्रेमाचे वारे वाहू लागलेयत. त्यामुळे अर्थातच कपिलचा शो ही याला अपवाद ठरला नाही. यावेळी व्हॅलेंटाईन डे च्या निमित्तानं त्यानं बोलावलं इंडस्ट्रीतलं ग्लॅमरस कपल बिपाशा बासू (Bipasha Basu)आणि करण सिंग ग्रोव्हर यांना. पण त्यावेळेस कपिलने करणची ज्या पद्धतीनं खिल्ली उडवली त्यामुळे मात्र त्याला कुठे चेहरा लपवू असं नक्कीच झालं असणार. सध्या या एपिसोडचा प्रोमो जोरदार व्हायरल होत आहे. (Bipasha & karan in Kapil Sharma Show)
बिपाशा आणि करणसोबत या व्हॅलेंटाईन स्पेशल भागात कपिलने असे काही विनोद केलेयत की पाहताना प्रेक्षकांची हसून हसून पुरती वाट होणार आहे. त्यात करणला तर त्याच्या फिटनेसला घेऊन जरा जास्तच छेडण्यात आलं. जेव्हा बिपाशा-करणची सेटवर एन्ट्री झाली तेव्हा तर पटकन त्या दोघांची प्रशंसा करताना कपिल म्हणून गेला की दहा वर्षांआधी आणि नंतर हे असेच दिसतील यात मतभेद असूच शकत नाहीत. पण पुढे लगेच त्यानं म्हटलं,''हे ते लोक आहेत जे त्यांच्या लग्नाच्या पहिल्या रात्री दूध नाही तर प्रोटीन शेक पिऊन झोपतात''..पण हे ऐकल्यानंतर मात्र बिपाशा-करणला या कपिलंच काय करू असं नक्कीच झालं असेल. पुढे कपिलनं करणच्या अंगावरील सर्व टॅटूंना घेऊनही त्याची खिल्ली उडवली. ''तुला कपड्यांची गरजच लागत नसेल इतके टॅटू तुझ्या अंगावर आहेत तर''. तेव्हा बिपाशाच बोलली,''करणला कपडे खूप आवडतात पण त्याहीपेक्षा कपडे न घालणं त्याला अधिक पसंत आहे''.
पुढे अर्चना पुराणसिंगनं जेव्हा बिपाशाला विचारलंकी,'' तु करणशी भांडतेस का? आणि त्याची कारणं काय असतात?'' तेव्हा बिपाशा म्हणाली,'' मी बोलते,भांडत नाही''. तेव्हा मध्येच कपिल म्हणाला,''हो तेच ते,भांडण बोलूनच करतात,हंटर मारुन नाही''. तर याच शो मध्ये करणने मात्र कबूल केलं की प्रत्येकवेळी तो एखादी वेगळी चूक करतो आणि त्यावरुन त्याला ऐकावं लागतं. पण हे सारं संभाषण इतकं विनोदी पद्धतीनं समोर आलं की हा व्हॅलेंटाईन स्पेशल एपिसोड पाहताना प्रेक्षकांना मात्र धम्माल येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.