Kapil Sharma Show esakal
मनोरंजन

Kapil Sharma Show : 'घरात आल्यानंतर तो...' 'त्या' सवयीला कपिलची बायको वैतागली!

टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय शो कपिल शर्मा शोची लोकप्रियता मोठी आहे. गेल्या काही वर्षांपासून या मालिकेनं प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Kapil Sharma Silent zone wife angry reveal : टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय शो कपिल शर्मा शोची लोकप्रियता मोठी आहे. गेल्या काही वर्षांपासून या मालिकेनं प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. भलेही कपिलच्या आक्रमक, तापट आणि हेकेखोर स्वभावामुळे त्याचे अनेक सहकारी त्याला सोडून गेले असतील, पण कपिलच्या लोकप्रियतेत कमी झालेली नाही.

कपिल हा नेहमीच त्याच्या विनोदी स्वभाव, हजर जबाबीपणा यामुळे लोकप्रिय झालेला दिसतो. त्यामुळेच की काय त्याचा शो पाहणाऱ्यांची, त्याला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कपिलच्या प्रोफेशल लाईफमध्ये भरभराट आहे तर वैयक्तिक आयुष्यामध्ये काही आलबेल नसल्याचे दिसून आले आहे. स्वता कपिलनं त्याच्या शोमध्ये याविषयी केलेला खुलासा हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

Also Read - स्टाॅक मार्केटमधलं ट्रेडर बनायचंय..मग ही पथ्यं पाळाच...

एका कारणामुळे कपिलच्या घरामध्ये कायमच वाद होत असतो. कपिलच्या एका सवयीमुळे त्याची पत्नी त्याच्यावर चिडचिड करत असते. असे त्याच्या पत्नीचे म्हणणे आहे. कपिल हा जेव्हा त्या शो मध्ये अँकरिंग करत असतो तेव्हा मात्र पोपटासारखा बोलतो, फ्लर्टिंगही करतो. घरी आल्यावर त्याला काय होते माहिती नाही आल्यानंतर तो कुणाशीही काहीही बोलत नाही. एकदम शांत होऊन जातो.

टीव्ही अँकर अंजना ओम कश्यप, चित्रा त्रिपाठी आणि श्वेता सिंह हे कपिलच्या शो मध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी कपिल त्यांच्याशी बातचीत करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले असून त्याला मिळालेला प्रतिसाद मोठा आहे. त्याचं झालं असं की कपिलनं अंजना ओम कश्यपला प्रश्न विचारला होता की, स्टुडिओमधून बाहेर पडल्यानंतर तुला आणखी कुणाशी बोलावंस वाटतं का, त्यावर ती म्हणते नाही.

त्यावर कपिल म्हणतो मलाही असेच होते. मी घरी गेल्यानंतर अजिबात बोलण्याच्या मूडमध्ये नसतो. मात्र मी घरी गेल्या गेल्या बायकोला माझ्याशी बोलायचे असते. आमच्यात भांडणं सुरु होतात. तिचं म्हणणं असतं की, मी तिच्याशी बोलत नाही. असं काही नाही मला फक्त काही वेळ शांतता हवी असते. त्यामुळे मी बोलत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 ORANGE CAP: वैभव सूर्यवंशीची ऑरेंज कॅपच्या शर्यतीत गरुड झेप! विराट कोहली, रोहित शर्मा टॉप फाईव्हमध्येही नाहीत...

RR vs RCB Live : शाब्बास वैभव... राजस्थानचा विजयी चौकार, विराटच्या रॉयल्सचा केला कचरा; IPL 2026 Point Table मध्ये दबदबा

RR vs RCB Live : १५ चेंडूंत ७४ धावा चोपल्या... Vaibhav Sooryavanshi च्या वादळासमोर गतविजेत्यांचा पालापाचोळा; ध्रुव जुरेलसोबत ८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

Local Megablock: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी मुंबई लोकलच्या ‘या’ मार्गांवर जंबो ब्लॉक; वेळापत्रकात फेरबदल जाहीर

RR vs RCB Live : ४,४,४,६,६... वैभव सूर्यवंशीचे १५ चेंडूंत अर्धशतक; ३००+ चा स्ट्राईक रेट अन् जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमारची बेक्कार धुलाई

SCROLL FOR NEXT