Karan Johar Hugs Priyanka Chopra And Nick Jonas At Nmacc Event Kangana gets troll for tweet viral  Esakal
मनोरंजन

कंगना तोंडावर पडली..! प्रियांका चोप्रा - करण जोहरची एकमेकांना गळाभेट, व्हिडिओ व्हायरल

Vaishali Patil

बॉलिवूडची 'देसी गर्ल' म्हणजेच प्रियांका चोप्रा ही नेहमी चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून प्रियंका तिच्या बॉलिवूडवर केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली होती. रिपोर्ट्सनुसार, प्रियांका 'सिटाडेल' या ग्लोबल एपिक स्पाय थ्रिलर वेब सीरिजच्या एशिया पॅसिफिक पत्रकार परिषदेसाठी भारतात परतली आहे. अभिनेत्री तिच्या नुकत्याच केलेल्या वक्तव्यामुळे खूप चर्चेत आहे.

तिने बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीबद्दल सांगितले होते की, तिला इंडस्ट्रीने खूप त्रास दिला आहे. तिने सांगितले की, तिला कोणताही निर्माता दिग्दर्शक काम देण्यासाठी तयार नव्हता.

बोलली प्रियंका मात्र भारतात चर्चा झाली ती कंगणा राणौतची. प्रियंकाला पाठिंबा देत कंगणानं लगेच ट्विट करत बॉलिवूड माफियांवर टिका केली. कंगनानं याचं समर्थन करताना करण जोहरवर निशाणा साधला.

मुंबईत शुक्रवारी रात्री बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा उद्घाटनं सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रियांका आणि करण या कार्यक्रमात बोलताना दिसले. त्यात दोघांमध्ये सगळं ठीक असल्याचं दिसतयं.

प्रियांका आणि करणला एकत्र पाहून दोघांमध्ये काही दुरावा आहे असे अजिबात वाटत नव्हते. पार्टीत दोघेही एकमेकांकडे बघून हसताना दिसले, दरम्यान प्रियांकाचा पती निक जोनासही तिच्यासोबत उपस्थित होता. त्यानेही करणशी संवाद साधला.

बॉलिवूडची 'क्वीन' कंगना रणौतने प्रियांकाच्या वक्तव्याचे समर्थन करताना चित्रपट निर्माता करण जोहरवर निशाणा साधला होता. या दोघांमध्ये बऱ्याच दिवसांपासून शीतयुद्ध सुरू आहे, पण नुकतेच समोर आलेले फोटो वेगळीच कहाणी सांगत आहेत, जे पाहून कंगनाच्या हल्ल्याचा यावेळी उलटसुलट परिणाम झाल्याचे दिसते.

त्यामुळे आता कंगणाने प्रियंकाला पाठिंबा देण्यासाठी विनाकारण करणवर निशाणा साधला होता का? हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता कंगनाची प्रतिक्रिया काय असेल असे अनेक प्रश्न आता नेटकरी तिला विचारत आहेत.

करण जोहरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झालं तर त्याचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट 28 जुलै रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंग पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. तर प्रियांका चोप्रा तिच्या हॉलिवूड सिरिज 'सिटाडेल'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT