Karan Johar revealing that he remembers that the sara and janhavi ‘have dated siblings before’ Esakal
मनोरंजन

दोन सख्ख्या भावांशी सारा-जान्हवीचं जुळलेलं सूत,दोघे करण जोहरचे सख्खे शेजारी

'Koffee With karan7' शो मध्ये सारा आणि जान्हवीनं करण समोर खळबळजनक खुलासे केले आहेत

प्रणाली मोरे

बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान(Sara ali Khan) आणि जान्हवी कपूर(Janhavi Kapoor) यावेळी करण जोहरच्या 'कॉफी विथ करण ७' च्या दुसऱ्या एपिसोडमध्ये एकत्र दिसणार आहेत. या शो मध्ये सारा आणि जान्हवी करण समोर खळबळजनक खुलासे केले आहेत. यावेळी दोन्ही अभिनेत्रींनी आपल्या डेटिंग विषयी देखील मोकळेपणाने संवाद साधला आहे. शो मध्ये खुलासा झाला आहे की सारा आणि जान्हवीनं २ भावांना डेट केली आहे.(Karan Johar revealing that he remembers that the sara and janhavi ‘have dated siblings before’)

शो च्या दरम्यान करण जोहर म्हणाला, ''मला माहित आहे की तुम्ही दोघींनी दोन भावांना डेट केलं आहे. कोरोनाच्या आधीच्या दिवसांबद्दल बोलायचं झालं तर मला माहित नाही आज तुमच्यात किती चांगली मैत्री आहे. माझं म्हणणं आहे की ही खूप जुनी गोष्ट आहे. पण तुम्ही दोन भावांना डेटिंग केलं होतं. आणि आमच्या तिघांमध्ये एक कॉमन गोष्ट होती की कधीतरी आम्ही तिघे एकाच इमारतीत राहायचो''.

असं म्हटलं जातं की काही वर्षांपूर्वी सारा अली खान आणि जान्हवी कपूर पहाडिया ब्रदर्सना डेट करत होत्या. वीर पहाडिया आणि शिखर पहाडिया अशी त्यांची नावं आहेत. श्रीमंत आणि राजकीय कुटुंबाशी त्यांचा संबंध होता. त्यांचे आजोबा माजी केंद्रिय मंत्री सुशील कुमार शिंदे होते आणि वडील संजय पहाडिया मुंबईचे एक मोठे व्यावसायिक आहेत. वीरचं वय २८ वर्ष असून तो शिक्षणासाठी दुबईत आहे. शिखरचं वय २३ वर्ष असून,तो लंडनमध्ये शिकत आहे. दोन्ही भावांची एक एंटरटेन्मेंट आणि गेमिंग कंपनी आहे. ज्या कंपनीची सुरुवात त्यांनी २०१८ मध्ये केली होती.

सारा आणि जान्हवीच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर विक्रांत मैसीसोबत 'गॅसलाइट' सिनेमात सारा दिसणार आहे तर विकी कौशलसोबत देखील ती एका सिनेमात काम करतेय. जान्हवी कपूर 'गुड लक जैरी' सिनेमात दिसणार आहे. तर राजकुमार रावसोबत ती 'मिस्टर अॅन्ड मिसेस माही' आणि वरुण धवन सोबत 'बवाल' सिनेमातही काम करतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : उद्धव ठाकरे, राज ठाकरे मराठी विजय मेळाव्यासाठी वरळी डोम येथे दाखल; थोडाचवेळात धडाडणार तोफ

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT