Karan Johar shares his dream cast of Kuch Kuch Hota Hai remake.  Google
मनोरंजन

करणच्या सुपरहिट 'कुछ कुछ होता है' चा Remake,'या' कलाकारांची लागू शकते वर्णी

१९९८ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमात शाहरुख खान,काजोल आणि राणी मुखर्जीने महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारल्या होत्या.

प्रणाली मोरे

करण जोहरच्या(Karan Johar) १९९८ साली आलेल्या 'कुछ कुछ होता है'(Kuch Kuch Hota Hai) सिनेमानं त्यावेळी बॉक्सऑफिसवर भरघोस कमाई केली होती. प्रेक्षकांनी अक्षरशः सिनेमाला उचलून धरलं होतं. या सिनेमाचं दिग्दर्शन करण जोहरने स्वतः केलं होतं. शाहरुख खान,काजोल (Kajol)आणि राणी मुखर्जी या कलाकारांनी या सिनेमात महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. आज करण जोहरला या सिनेमाचा रीमेक बनवायचा आहे. काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत करणला या सिनेमाच्या रीमेक विषयी विचारले गेले होते,त्याविषयी बोलताना करण म्हणाला होता,''रीमेक बनवायला मला आवडेल,तसा विचारही सुरु आहे. आणि या रीमेकमधील स्टारकास्ट विषयी बोलताना दोन मिनिटाचा अवधीही न घेता करण पटकन म्हणाला होता,रणवीर सिंग,आलिया भट्ट आणि जान्हवी कपूर या सिनेमात कलाकार असतील. ही माझी ड्रीम कास्ट आहे,आणि या सिनेमाचं दिग्दर्शन आणि निर्मिती देखील मला करायला आवडेल. पण सध्या हे केवळ विचारात आहे,कोणत्याही पेपरवर हे अजून मी उतरवलेलं नाही''.(Karan Johar shares his dream cast of Kuch Kuch Hota Hai remake).

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत करण म्हणाला आहे की,''रणवीर सिंग शाहरुख खानच्या भूमिकेत,आलिया भट्ट काजोलच्या आणि जान्हवी राणी मुखर्जीची भूमिका साकारेल. जान्हवी राणीने साकारलेली भूमिका चांगली निभावेल. कारण एक काॉलेज गर्ल,ती देखील हॉट मुलगी या भूमिकेत जान्हवी एकदम फिट बसेल''.

यावेळी आपली मुलं मोठी झाल्यावर आपल्याला त्यांच्यासाठी कशा पद्धतीचा सिनेमा बनवायला आवडेल यावर करण म्हणाला,''आताची पिढी हुशार आहे, त्यांचा खुप लवकर विकास होत आहे. त्यामुळे त्यांच्या साठी मला एक हॅप्पी सिनेमा बनवायला आवडेल,जो मुलांना केवळ आनंद देईल''.

करण जोहर आता आपला फेमस 'कॉफी विथ करण' या शो चा ७ वा सिझन घेऊन रसिकांच्या भेटीस आला आहे. दरवेळे प्रमाणे यंदाचा सिझनही गाजेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. पहिल्याच भागात आलेल्या रणवीर सिंग आणि आलिया भट्टनं करणच्या मजेदार प्रश्नांना धमाल उत्तरांची बॅटिंग करत चाहत्यांचे प्रेम मिळवले आहे. शो चा पहिला एपिसोड लोकांना आवडेला दिसत आहे. रणवीर सिंग आणि आलिया भट्ट करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमात दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीए परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT