Karan Johar Esakal
मनोरंजन

Karan Johar: 'आता विमानतळावरही पत्रकार परिषदा होतील', करण जोहरचा कंगणाला टोला!

Vaishali Patil

बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहर अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो, मात्र गेल्या अनेक दिवसांपासून तो प्रियांका चोप्राच्या बॉलीवूडबाबतच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे.

खरं तर कंगना राणौतने करण जोहरवर प्रियांका चोप्राला धमकावल्याचा आरोप केला बॉलिवूडमध्ये तिचा छळ केला जात होता आणि त्याचबरोबर असे अनेक आरोप तिने करणवर लावले. खर तर कंगणा नेहमीच करण जोहरवर आणि बॉलिवूड माफिया गँगवर टिका करत असते. मात्र त्यावर कोणीही प्रतिक्रिया देत नाहीत .

दरम्यान आता निर्माता-दिग्दर्शकाने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे, ज्याद्वारे त्याने कंगना राणौतचं नाव न घेता तिची खिल्ली उडवली आहे.

करणने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सांगितले की लोकांनी विमानतळावर पत्रकार परिषद कशी घेतली. दिग्दर्शकाने लिहिले, 'विमानतळ एक रनवे आहे... तिथे पत्रकार परिषद देखील घेतली जाते.... पुढच्या वेळी तिथे ट्रेलर लॉन्च ही होऊ शकत! (मी त्याचे सदस्यत्व घेतो...कोणतीही तक्रार नाही... मात्र कधी फ्लाइट पकडणं खूप छान आहे...)' करण जोहरने कंगनाचे नाव न घेता टोमणा मारल्याचे अनेकांचे मत आहे.

नुकताच कंगना राणौतचा व्हिडिओ समोर आला होता जेव्हा ती विमानतळावर दिसली होती यावेळी कंगना म्हणाली, तुम्ही लोकं फार हुशार आहात. जेव्हा काही वाद होतो तेव्हा तुम्ही बॉलीवूड माफियांना अजिबात प्रश्न विचारत नाही. आणि माझ्यावरुन काही वाद झाला तर लगेच मला प्रश्न विचारुन भंडावून सोडतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT