koffee with karan already gets boycott warning  sakal
मनोरंजन

'कॉफी विथ करण' सुरु होण्याआधीच वादात.. नेटकरी म्हणाले..

करण जोहरचा 'कॉफी विथ करण' हा कार्यक्रम सुरु होण्याआधीच वादात अडकला असून नेटकऱ्यांनी टीका केली आहे.

नीलेश अडसूळ

कलाकारांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातील बऱ्या वाईट गोष्टी जाणून घेत त्यांची पोलखोल करणारा 'कॉफी विथ करण' हा कार्यक्रम गेली काही वर्षे सुरु आहे. करोनापूर्वी या कार्यक्रमाचा सहावा सिझन पार पडला होता या कार्यक्रमाचे पुढचे पर्व कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर हे पर्व लवकरच येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे.

या कार्यक्रमात बॉलीवूड मधील अनेक कलाकार करण जोहर सोबत गप्पा गोष्टी करतात. कॉफी आणि कारण यांच्यासह या गप्पांमध्ये अनेक गॉसिप्स उलगडले जातात. मध्यंतरी हा कार्यक्रम बंद झाला असल्याची चर्चा सुरु होती. पण लवकरच या कार्यक्रमाचे चित्रीकरण सुरु होणार आहे. यंदाच्या पर्वात अक्षय कुमार, वरुण धवन, कियारा अडवाणी, अनिल कपूर, नीतू सिंग, सिद्धार्थ मल्होत्रा, रश्मिका मंदान्ना, कतरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी, आलिया भट, रणबीर कपूर यांसारखे सेलिब्रिटी यासहभागी होणार आहे. पण हा कार्यक्रम सुरू होण्याआधीच वादात अडकला आहे. या कार्यक्रमावर नेटकऱ्यांनी सडकून टीका केली आहे.

ही बातमी व्हायरल होताच ट्विटरवर टीकेची झोड उठली. 'आम्ही या कार्यक्रमावर बहिष्कार टाकू' अशी प्रतिक्रिया एकाने दिली आहे. तर 'हा कार्यक्रम बंद करा' असेही एकाने म्हंटले आहे. तर एक नेटकरी म्हणतो,'या पर्वात काही कुणी मोठे कलाकार येणार नाहीत त्यामुळे हे पर्व फ्लॉप ठरणार आहे.' 'इथे केवळ नेपो किड्स येतील, अजून काही होणार नाही,' अशी टीका एकाने केली आहे. तर एक नेटकरी म्हणतो, 'आता करण कोणाचं आयुष्य उध्वस्त करणार आहे.' काही नेटकऱ्यांनी तर मर्यादा सोडूनही टीका केली आहे. त्यामुळे हा शो सुरु होण्याआधीच वादाला तोंड फुटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; विसर्जन मिरवणुकीमुळे पीएमपी बसच्या मार्ग आणि स्थानकांत बदल, हे आहेत पर्यायी मार्ग

Bank News : ग्राहकांसाठी रविवारी बँका सुरू; २८ ते ३० सप्टेंबरच्या संपाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Nanded Farmers: ‘काजू-बदाम खा, पण शेतकऱ्यांना न्याय द्या’; अर्धापुरात काँग्रेसचा जनाक्रोश, घंटानाद करून दुष्काळ जाहीर

मुंबईकरांचा प्रवास सुसाट! ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भुयारी मार्गासह 'ठाणे-बोरिवली'साठी दुय्यम कर्ज; सरकारचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : पुण्यात विसर्जन सोहळ्यासाठी महापालिकेची तयारी

SCROLL FOR NEXT