Kareea Kapoor Actress The Buckingham Murders premiere  esakal
मनोरंजन

Kareena Kapoor : करिनाचा 'The Buckingham Murders' लंडनच्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये! हंसल मेहतांचे दिग्दर्शन

करिनानं इंस्टावर शेयर केलेल्या त्या पोस्टकडे चाहत्यांचे लक्ष वेधले गेले आहे.

युगंधर ताजणे

Kareea Kapoor Actress The Buckingham Murders premiere : बॉलीवूडची बेबो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करिनानं चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. तिचा आगामी द बकिंगहॅम मर्डर्स नावाचा मुव्ही या लंडनच्या बीएफआय नावाच्या फेस्टिव्हलमध्ये दाखवला जाणार आहे. करिनाच्या करिअरमधील सर्वात मोठी गोष्ट मानली जात आहे.

The Buckingham Murders या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. त्याचे दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केले आहे. मेहता हे त्यांच्या वेगवेगळ्या प्रयोगशील कृतींमुळे ओळखले जाणारे दिग्दर्शक आहेत. यापूर्वी त्यांच्या स्कॅम १९९२ या वेबसीरिजनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या त्यांची अब्दुल करीम तेलगीच्या आय़ुष्यावरील स्कॅम २००३ ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Also Read - दिल्लीतल्या केवळ प्रशासकीय बदल्यांपुरतंच मर्यादित नाही, दिल्ली सेवा विधेयक. काय आहेत

मेहता यांच्या तेलगीच्या मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. सध्या ते लंडनच्या ६७ व्या बीएफआय या चित्रपट महोत्सवामुळे प्रकाशझोतात आले आहेत. त्यांच्या The Buckingham Murders या चित्रपटाचा प्रीमिअर या महोत्सवात होणार असल्याची माहिती करिनानं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेयर केली आहे. करिनानं इंस्टावर शेयर केलेल्या त्या पोस्टकडे चाहत्यांचे लक्ष वेधले गेले आहे.

करिनानं लिहिलं आहे की,The Buckingham Murders हा हंसल मेहता यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट लंडनच्या प्रसिद्ध चित्रपट महोत्सवामध्ये दाखवला जाणार आहे, याचा विशेष आनंद आहे. माझ्यासाठी ही मोठी गर्वाची बाब आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं जोडलं जाणं माझ्यासाठी वेगळा अनुभव होता. अशा शब्दांत करिनानं तिची भावना व्यक्त केली आहे.

आमिर खानच्या लाल सिंग चढ्ढानंतर करिनाचा The Buckingham Murders हा चित्रपट येतो आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना या चित्रपटाची मोठी उत्सुकता आहे. लाल सिंग चढ्ढाला प्रेक्षकांनी नाकारले होते. त्यावरुन मोठा वादही झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

K Annamalai: 'मी मुंबईत येणार, हिंम्मत असेल तर पाय कापा'! के. अन्नामलाईंचे राज ठाकरेंना थेट आव्हान; महाराष्ट्रात वातावरण तापलं

Dhule Municipal Election : दोन बिनविरोध अन्‌ दोन जागांसाठी ‘काटा लढत’ श्रमिक, कष्टकऱ्यांच्या प्रभागात अभ्यासू अभियंता, व्यावसायिक, महाराज मैदानात

Golden Global Awards : प्रियंकाला पाहून निक जोनासची नजरच हटेना , गोल्डन ग्लोब अवॉर्डमधील व्हिडिओ व्हायरल

Ichalkaranji Election : ६५ जागांचे स्वप्न अपूर्ण; ११ उमेदवारांवरच परिवर्तन आघाडीची इचलकरंजीत कसोटी

Latest Marathi News Live Update : बाणेरमध्ये सिमेंट मिक्सरच्या धडकेत बांधकाम मजुराचा मृत्यू

SCROLL FOR NEXT