Kareena Kapoor And Karishma Kapoor Celebrate Ganesh Festival With Family esakal
मनोरंजन

करिना अन् करिश्माने साजरा केला गणशोत्सव, कपूर कुटुंबीय आले एकत्र

करिना कपूर अन् करिश्मा कपूरने साजरा केला गणशोत्सव कुटुंबीयांसोबत

सकाळ डिजिटल टीम

Kareena Kapoor And Karishma Kapoor Celebrate Ganesh Festival With Kapoor Family : बाॅलीवूडच्या कपूर कुटुंबीयांनी गुरुवारी गणेश चतुर्थी एकत्र साजरा केली. करिना कपूर (Kareena Kapoor) आणि करिश्मा कपूरने (Karishma Kapoor) सोशल मीडियावर गणपती पूजेचे अनेक आकर्षक फोटो शेअर केले आहेत. पूजा त्यांचे वडील रणधीर कपूर यांच्या घरी झाली. करिनाची आई बबिता, काकू रीमा जैन, चुलत भाऊ आधार जैन आणि अरमान जैन तसेच अरमानची पत्नी अनिसा मल्होत्रा-​​जैन यांनीही गणपती पूजेला हजेरी लावली होती.

करिनाचा मुलगा जेह

करीना कपूरने या खास सोहळ्याचे फोटो इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोमध्ये करीना तिचा मुलगा जहांगीर अली खानसोबत गणेश मूर्तीसमोर बसलेली दिसत आहे. या फोटोमध्ये करीना मल्टिकलर सूटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. आणि तिचा मुलगा जेह याने पांढर्‍या पँटसह काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला आहे. दुसऱ्या एका चित्रात जेह फळांच्या टोपलीतून फळे उचलताना दिसत आहे. (Ganesh Festival)

करीनाच्या पोस्टवर तिची वहिनी सबा पतौडीने लिहिले, गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा. या शिवाय फॅमिली फोटोमध्ये जेहची खोडकर स्टाईल खूपच क्यूट दिसत आहे. जेहच्या फोटोसाठी एका चाहत्याने लिहिले, 'ओ सो क्यूट'. दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, 'तुम्हा दोघांसाठी प्रेम.' या फोटोंवर चाहते प्रेमाचा वर्षाव करताना दिसले.

करिश्माने लिहिले 'फॅमिली'

करिश्मा कपूरने या खास प्रसंगी गडद पिवळ्या रंगाचा सूट निवडला. शेअर केलेल्या फोटोमध्ये करिश्मा गणपतीच्या मूर्तीसमोर बसलेली दिसली. नेहमीप्रमाणे ती तिच्या पारंपारिक लूकमध्ये जबरदस्त दिसत होती. या कौटुंबिक सेलिब्रेशनच्या क्षणी करिश्मा आणि करीना व्यतिरिक्त, चित्रात तिचे पालक रणधीर कपूर आणि बबिता तसेच रणधीरची बहीण रीमा देखील हजर होती. अरमानची पत्नी अनिसासोबत त्याची दोन मुलं आधार आणि अरमानही होते. करिश्माने या फोटोला 'फॅमिली' असे कॅप्शन दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी कपात, २०० रुपयांनी झाले स्वस्त

Tamhini Ghat: ताम्हिणी घाट अद्याप वाहतुकीसाठी बंद; नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

India Monsoon Forecast : विदर्भ-मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी! बंगालच्या उपसागरातील घडामोडींमुळे जुलै तर तरला, पण पुढील 2 महिने कसा राहील मॉन्सून? पाहा काय सांगतो IMD रिपोर्ट

India Medal Tally in CWG 2026: 'Gen Z' ची हवा! ज्युदोत ३ ऐतिहासिक पदकं अन् नीरजचे रौप्य... तालिकेत भारत कितव्या क्रमांकावर?

PM Narendra Modi: "माझ्या आईचाही अपमान झाला... पण मी तुम्हाला माफ करतो"; जंतर मंतर प्रकरणावर PM मोदींचा भावनिक इन्स्टा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT