Taimur-Kareena-Kapoor 
मनोरंजन

...यासाठी तैमूरने करिनाकडे मागितली दोन गिफ्ट!

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड सेलेब्रिटी आणि त्यांच्या मुला-मुलींची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होते. कारण काहीही असो, हा विषय कायम ट्रेंडिंग असतो. बी-टाऊनमधील काही फेवरेट जोड्यांपैकी सोशल मीडियात कायम बोलबाला राहिला आहे तो सैफ अली खान पतौडी आणि करिना कपूर यांचा. 

सैफ-करिना यांचा लाडका मुलगा तैमूर नेटकऱ्यांसाठी कायम हॉट टॉपिक असतो. इतर स्टारकिड्सना जेवढी प्रसिद्धी मिळाली नाही, त्यापेक्षा कैकपटीने जास्त प्रसिद्धी तैमूरला लहान वयातच मिळाली आहे. येत्या 20 डिसेंबरला तैमूरला तीन वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे पतौडी घराण्यात सध्या उत्साहाचे वातावरण आहे. 

आपल्या वाढदिवसानिमित्त तैमूरनं त्याची आई करिनाकडे बर्थडे गिफ्टची मागणी केली आहे. तैमूरला बर्थडे गिफ्ट काय देणार आहे? असा प्रश्न विचारल्यानंतर करिना म्हणाली, तैमूरने बर्थडे गिफ्ट म्हणून मला दोन केक मागितले आहेत. सांताक्लॉज आणि हल्क असणारे केक त्याला आवडतात. त्यामुळे ते दोन केक त्याला बर्थडे दिवशी गिफ्ट करणार आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'शी बोलताना करिनाने याबाबतचा खुलासा केला. 

- सनी दाचा जीव रंगला 'या' व्यक्तीमध्ये, बांधली आयुष्याची गाठ
   
तैमूरच्या वाढदिवसाला कोणकोणते सेलेब्रिटी येणार आहेत? आणि कुणाला निमंत्रण पाठवलं आहे का? असे विचारले असता करिना म्हणाली, ''तैमूरचे मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबातील सदस्य मिळून त्याचा वाढदिवस साजरा करणार आहेत. अजून कुणाला निमंत्रण दिलं गेलं नाही.''  

गेल्यावर्षी एका जाहिरातीच्या चित्रीकरणामुळे खान कुटुंब परदेशात होतं. त्यामुळे तैमूरचा दुसरा वाढदिवस परदेशातच साजरा केला. मात्र, यंदा संपूर्ण कुटुंब मुंबईतच असल्याने त्याचा तिसरा वाढदिवस इथेच साजरा करणार आहोत, असंही करिना म्हणाली.

सध्या करिना तिचा आगामी चित्रपट 'गूड न्यूज'च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, कियारा अडवाणी आणि दलजित दोसांज हे करिनाचे सहकलाकार आहेत. 

तसेच करिना पुढील वर्षी आमीर खानसोबत 'लालसिंग चढ्ढा' आणि रणवीर सिंगसोबत 'तख्त' या चित्रपटात दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar : १४ आक्षेप, १६.१० लाख अपील... निवडणूक आयोगात पडद्यामागे काय घडलं? ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका

‘कौन बनेगा करोडपती’मध्ये उज्ज्वल निकम यांनी जिंकली प्रेक्षकांची मन, जिंकलेली रक्कम दान करण्याचा निर्णय

Gokul Election: ‘कप-बशी’ चिन्हासाठी प्रतिष्ठेची लढाई;सतेज पाटील गटाचा पहिला, त्यानंतर महायुतीचा अर्ज

Maharashtra Ganesh Visarjan Live: मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीत स्व-रूपवर्धिणी मल्लखांब पथकाचे थरारक सादरीकरण

Gyanesh Kumar Resignation : कॉकरोच जनता पार्टी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात रस्त्यावर उतरणार; गांधी जयंतीला देशव्यापी आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT