Kareena Kapoor Khan sharing video of taimur ali khan..skiing in the snow Google
मनोरंजन

Taimur Ali Khan Video: 'तुमचा तैमुर भलताच भन्नाट',करिना-सैफवर कौतूकाचा वर्षाव

करिना कपूरनं तैमूरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्याची सगळीकडे चर्चा रंगली आहे.

प्रणाली मोरे

Taimur Ali Khan Video: बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर खान आपल्या प्रोफेशनल लाईफपेक्षा आपल्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. करिना कपूर खान इन्स्टाग्रामवर नेहमीच आपल्या आयुष्याशी जोडलेल्या अनेक इंट्रेस्टिंग गोष्टी शेअर करताना दिसते,ज्याचा आनंद तिचे चाहते मनापासून घेतात.

नवीन वर्षाचं स्वागत करताना करिनानं अशाच काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत. एकीकडे करिनानं आपले काही फोटो शेअर केलेयत तिथे दुसरीकडे तिनं आपला मुलगा तैमूर अली खानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याला पाहून तुम्ही देखील काही क्षण हैराण व्हाल एवढं नक्की.(Kareena Kapoor Khan sharing video of taimur ali khan..skiing in the snow)

करिनानं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकता की तैमूर बर्फात स्कीइंग करताना दिसत आहे. या व्हिडीओत एक गोष्ट खास ठरतेय ते तैमूर वयाच्या फक्त ६ व्या वर्षी ज्या सराईतपणे स्क्रीइंग करतोय ते पाहून. त्याचं परफेक्शन एकदम भन्नाट आहे. तैमूरच्या या व्हिडीओला करिना आणि त्याच्या फॅन पेजवर खूप शेअर केलं जात आहे. आणि खूप प्रशंसाही केली जात आहे.

या व्हिडीओआधी करिनानं एक फोटो शेअर केला होता. फोटोत करिना सूर्यास्ताचा आनंद घेताना दिसत होती. आणि खरंच तो २०२२ चा शेवटचा सूर्यास्त होता. फोटो शेअर करत करिनानं लिहिलं होतं की-''२०२२ च्या शेवटच्या सूर्यास्तासोबत पोझ देताना मी.. २०२३ मी तुझं स्वागत करायला सज्ज आहे''. करिनाच्या या पोस्टनं चाहत्यांची खूप पसंती मिळवली.

करिनाच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं तर ती शेवटची 'लाल सिंग चड्ढा' सिनेमात दिसली होती. आता लवकरच ती हंसल मेहता यांच्या आगामी सिनेमात दिसणार आहे. याव्यतिरिक्त करिना सुजॉय घोषच्या 'मर्डर मिस्ट्री' मध्ये देखील दिसणार आहे. नेटफ्लिक्सवर रिलीज होणाऱ्या या सिनेमात तिच्यासोबत विजय वर्मा आणि जयदीप अहलावत देखील दिसणार आहे. याव्यतिरिक्त करिना रिया कपूरसोबतही एक प्रोजोक्ट करत आहे,जिनं 'वीरे दी वेडिंग'ची निर्मिती केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

SCROLL FOR NEXT