Priyanka Chopra, Kareena Kapoor reaction on shahid Kapoor  Esakal
मनोरंजन

Viral Video:जेव्हा कॅमेऱ्यासमोर करणनं छेडलेला शाहिद सोबतच्या अफेअरचा विषय.. उत्तर देताना करीना गडबडली पण प्रियंकानं मात्र..

करणच्या 'कॉफी विथ करण' शो मधील एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या भागात करीना आणि प्रियंका लग्नानंतर करणच्या शो मध्ये एकत्र आल्या होत्या.

प्रणाली मोरे

Viral Video: प्रियंका चोप्रा आणि करीना कपूर दोघीही जणी त्यांच्या अफेअर्समुळे लग्नाआधी नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. दोघींनी एकेकाळी एकाच अॅक्टरला डेट केलं आहे. आणि याचविषयी नेमकं करणनं त्याच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शो मध्ये दोघींना अचानक छेडलं. सध्या या शो चा जुना व्हिडीओ पुन्हा एकदा जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

आम्ही बोलतोय शाहिद कपूर विषयी. शाहिद कपूर आणि करीना कपूर यांनी एकमेकांना तब्बल ५ वर्ष डेट केलं होतं. तर प्रियंका आणि शाहिदनं जवळपास तीन वर्ष डेट केलं होतं. २०१९ मध्ये आलेल्या 'कॉफी विथ करण'च्या सीझन ६ मधील १९ व्या एपिसोडमध्ये करीना आणि प्रियंका एकत्र आल्या होत्या. यादरम्यान करणने दोघींना शाहिदविषयी प्रश्न विचारला होता.

शो मध्ये झालेल्या संवादा दरम्यान करण जोहरनं दोन्ही अभिनेत्रींना प्रश्न विचारला आहे की,'शाहिद दोघींचा देखील एक्स बॉयफ्रेंड आहे'. ज्यानंतर प्रियंका चोप्रा बोलते,'हा काही वादाचा मुद्दा नव्हता आमच्या दरम्यान. आमच्यासाठी हा कॉमन मुद्दा होता'. यावर करीना देखील पटकन रिप्लाय देते,'हो..हे खरं आहे'.

यापुढे करण जोहर करीनाकडे पाहत म्हणतो की, 'शाहीदला तू ५ वर्ष डेट केलं आहेस आणि प्रियंकाला म्हणतो,'तू २ वर्ष शाहीदला डेट केलंयस'.

यावर मजेदार अंदाजात म्हटलं,'मी केलंय का?' करण सरप्राइज होऊन विचारतो,'तुम्हा दोघींना हे अमान्य आहे का?' मग करिना देसी गर्ल प्रियंकाला म्हणते,'मला नाही माहीत याचं उत्तर..तू बोल..',

यावर प्रियंका हसून बोलते,'मी हे नाकारतही नाही..ना याचा स्विकार करते'. हा व्हिडीओ आता पुन्हा एकदा व्हायरल होताना दिसत आहे. आणि लोक जोरदार कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT