Karishma Kapoor Speaks On her Second Marriage Google
मनोरंजन

करिश्मा कपूरनं दुसऱ्या लग्नाविषयी तोडली चुप्पी; चाहत्यांना सांगितली अडचण

सोशल मीडियावर प्रश्न -उत्तराच्या लाइव्ह सेशन दरम्यान करिश्मा कपूरनं दुसऱ्या लग्नाविषयी आपले स्पष्ट विचार मांडले आहेत.

प्रणाली मोरे

बॉलीवूडमध्ये कपूर कुटुंब हे सगळ्यात मोठं,चर्चेत असलेलं,प्रसिद्ध घराणं. या कुटुंबातून गेल्या काही दिवसांपासून खूप चांगल्या आनंददायी बातम्या कानावर पडत आहेत. रणबीर कपूरनं (Ranbir Kapoor) आपली गर्लफ्रेंड आलिया भट्ट(Alia Bhatt) सोबत लग्न करुन आपल्या मॅरीड लाइफला मोठ्या दणक्यात सुरुवात केली आहे. या वेडिंग फंक्शनमधील एक फोटो करिश्मा कपूरनं(Karishma Kapoor) इन्स्टाग्रामवर पोस्ट केला अन् लगोलग रणबीरनंतर तिच्या लग्नाच्या बातम्या कानावर पडू लागल्या. पंजाबी लग्नात नवरीच्या हातात कलिरे बांधले जातात,नवरीनं हात हलवताच जर एखादा कलिरा अविवाहित मुलीच्या डोक्यावर पडला तर समजलं जातं की त्या मुलीचं लवकरच लग्न होणार आहे. रणबीरच्या लग्नात उपस्थित असलेल्या करिश्माच्या डोक्यावर आलियाच्या हातातील कलिरा पडला तेव्हा तोच फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्याची चर्चा अद्याप रंगताना दिसून येतेय. आता करिश्मानं त्या रंगलेल्या चर्चेमधून जे प्रश्न उठले आहेत त्यावर चुप्पी तोडली आहे.

करिश्मा कपूरनं इन्स्टाग्रामवर आपल्या चाहत्यांसोबत प्रश्न-उत्तरांचा एक लाइव्ह सेशन घेतला होता. त्या दरम्यान नेटकऱ्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले. तिचं आवडतं जेवण ते तिचा आवडता हिरो इथपर्यंत सर्वच प्रश्नांवर तिनं देखील मनमोकळा संवाद साधत उत्तरं दिली. पण एका नेटकऱ्यांन थेट करिश्माला विचारलं की,'ती पुन्हा लग्न करणार का?' आणि अखेर करिश्मानं लग्नाच्या प्रश्नावर चुप्पी तोडली.

चाहत्याच्या लग्नाच्या त्या प्रश्नावर करिश्मानं कन्फ्यूज आणि चिंतेत पडलेल्या एका माणसाचा जीआईएफ पोस्ट केला आणि लिहिलं,''Depends''. आणि हीच मनःस्थिती मोठी अडचण ठरत आहे करिश्माच्या लग्नात बहुधा.करिश्मा आतापर्यंत अनेकदा लग्नाच्या विषयावर बोलणं टाळत आली आहे. कारण तिच्या पहिल्या लग्नाचा शेवट फारसा चांगला झाला नव्हता. खूप वाईट पद्धतीनं तिला साऱ्या गोष्टींना त्यावेळी सामोरं जावं लागलं होतं.

माहितीसाठी सांगतो की,करिश्मा कपूरचं पहिलं लग्न २००३ साली दिल्ली स्थित व्यावसायिक संजय कपूरसोबत झालं होतं. लग्नानंतर करिश्माला समायरा आणि कियान ही दोन मुलं आहेत. करिश्मा आणि संजयचं फार काळ टिकलं नाही. आपसातील तणावांमुळे त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. घटस्फोटाला अनेक वर्ष होऊनही करिश्मा आजही सिंगल आहे,तर तिच्या पहिल्या नवऱ्यानं प्रिया सचदेव सोबत दुसरं लग्न करुन त्याला एक मुलही तिच्यापासून झालं आहे. आता रणबीरच्या लग्नानंतर मात्र अंदाज लावले जात आहेत की,करिश्मा कपूरही लवकरच लग्नबंधनात अडकेल. त्यात आता तिनं लग्नाविषयी दिलेल्या उत्तरावर चाहत्यांची उत्सुकता अधिकच शिगेला पोहोचली असणार हे नक्की. कारण लग्न करायचा विचार असल्याचे संकेतही तिनं उत्तरातून दिलेत पण अंतिम निर्णय घेताना गोंधळ उडतोय म्हणतेय. असो,तिच्या मनातील गोंधळाचं निरसन करणारा चांगला माणूस,जोडीदार म्हणून तिच्या आयुष्यात यावा या शुभेच्छा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women's World Cup: भारतीय खेळाडूच्या आजीला आलेला हार्टअॅटॅक, पण वर्ल्ड कपसाठी कुटुंबाने घेतलेला मोठा निर्णय

Donald Trump: चीन अन् रशियाकडून अणुचाचण्या सुरु असल्याचा ट्रम्प यांचा दावा; पाकिस्तानचंही घेतलं नाव, चीनकडून प्रत्युत्तर

Agriculture News : वाटाणा-शेवगा २०० रुपये किलो! अतिवृष्टीमुळे भाज्यांच्या दरात मोठी वाढ, सर्वसामान्य ग्राहक हैराण

Jaipur Accident: भीषण अपघात! डंपरची ४० वाहनांना धडक; ५० जणांना चिरडलं, ११ लोकांचा जागीच मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

World Youngest Billionier : वयाच्या 22 व्या वर्षी अब्जाधीश! भारतीय वंशाच्या दोन पठ्ठ्यांनी मोडला मार्क झुकरबर्ग यांचा विक्रम!

SCROLL FOR NEXT