Fake Video of Kartik aryan viral on MP Assembly Elections 2023  Esakal
मनोरंजन

Fact Check: 2024 च्या निवडणुकीपुर्वीच काँग्रेसचा प्रचार करतोय कार्तिक आर्यन? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

कार्तिक आर्यनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कार्तिक मध्य प्रदेश निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पाठिंबा देत असल्याचे बोलले जात होते. आता कार्तिकने या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.

Vaishali Patil

Kartik aryan viral video On MP Assembly Elections 2023:

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. कधी त्याच्या चित्रपटांची तर कधी त्याच्या लव्ह लाईफची चर्चा होत असते. खुप कमी कालावधीत त्याने बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. मात्र यावेळी तो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

17 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मध्य प्रदेश निवडणुकीत कार्तिक काँग्रेस पार्टी आणि त्याचे उमेदवार कमलनाथ यांना पाठिंबा देत असून काँग्रेस पार्टीचा प्रचार करत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत होता आता कार्तिकने या बाबत स्पष्टीकरण देत त्याची बाजू मांडली आहे.

कार्तिक आर्यनने त्याच्या अधिकृत अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये त्याने मध्य प्रदेश निवडणुकीत काँग्रेसच्या पाठिंबा दिल्याच्या वृत्तावर मौन सोडत प्रतिक्रिया दिली आहे.

त्याने एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. ज्यात तो OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar चे प्रमोशन करत होता. ही पोस्ट शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले - ही Disney Plus Hotstar ची खरी जाहिरात आहे, बाकी सर्व खोटे आहे.

त्याचे झालं असे की, कार्तिकने मोबाइल फोनवर ICC पुरुष विश्वचषक OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर विनामूल्य स्ट्रीमिंग संदर्भात एक जाहिरात केली होती. जी सुमारे महिनाभरापूर्वी प्रदर्शित झाली होती.

मात्र या जाहिरातीसोबत छेडछाड करण्यात आली. डब केलेल्या ऑडिओ आणि व्हिडिओसह यात मध्य प्रदेशात होणाऱ्या निवडणुकीसाठी कार्तिक आर्यन काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचे दाखवण्यात आलं होतं.

त्यामुळे कार्तिक आर्यनने निवडणूकीत काँग्रेसला समर्थन दिल्याच्या चर्चा सोशल मिडियावर सुरु झाल्या होत्या. मात्र आता कार्तिकने ही पोस्ट शेअर करत त्याचा आणि कोणत्याही राजकीय गटाचा काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

कार्तिक आर्यनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, कार्तिक आर्यन हा कबीर खानच्या चंदू चॅम्पियन या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तो त्याच्या 'भूल भुलैया 3' या हिट चित्रपटातही काम करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

Nashik Crime : अघोरी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नाशिकमध्ये भोंदूबाबावर पोक्सोचा गुन्हा

'पहाटेची वेळ आणि बसमध्ये पुरुषांचे घाणेरडे स्पर्श' भारती सिंहने सांगितला भयंकर अनुभव म्हणाली...'त्याने मला घट्ट पकडलं आणि...'

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

Pune News : गणेशोत्सवात गुन्हेगारीला ‘नो एन्ट्री’ ! पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा सराईत गुन्हेगारांना इशारा

SCROLL FOR NEXT