Kartik Aaryan Mocks Karan Johar And his show Koffee With Karan 7,say,‘Proud to be Popular on Rapid-Fire Shows’
Kartik Aaryan Mocks Karan Johar And his show Koffee With Karan 7,say,‘Proud to be Popular on Rapid-Fire Shows’ Google
मनोरंजन

Koffee With karan 7 शो ची कार्तिकने उडवली खिल्ली, म्हणाला, 'मला अभिमान....'

प्रणाली मोरे

बॉलीवूड अभिनेचा कार्तिक आर्यन(Kartik Aaryan) 'भूलभूलैय्या २' ला मिळालेल्या यशामुळे सध्या भलताच फॉर्मात आहे. पण त्याहीपैक्षा अधिक त्याची चर्चा रंगलेली पहायला मिळाली ते सारा अली खान करण जोहरच्या कॉफी विथ करण ७(Koffee With karan7) शो मध्ये आल्यानंतर. पण आता कार्तिकने करण जोहरच्या(karan Johar) शो मध्ये जी काही त्याची खिल्ली उडवली गेली याला चांगलेच उत्तर दिले आहे. कार्तिक आर्यन एका मुलाखतीत म्हणाला आहे,''रॅपिड फायर शोज मध्ये मी खूपच प्रसिद्ध आहे. आणि त्याला त्याच्या प्रसिद्धिचा खूपच अभिमान आहे''. चाहत्यांचे आता यावर म्हणणे आहे की,कार्तिक आर्यनचा हा इशारा करण जोहरच्या कॉफी विथ करण ७ या चॅट शो च्या दिशेनेच आहे.(Kartik Aaryan Mocks Karan Johar And his show Koffee With Karan 7,say,‘Proud to be Popular on Rapid-Fire Shows’)

करण जोहरच्या कॉफी विथ करण ७च्या चॅट शो मध्ये कार्तिक आर्यनचा आतापर्यंत अनेकदा उद्धार केला गेला वेगवेगळ्या पद्धतीनं. शो च्या पहिल्या ३ भागात कार्तिक आर्यनचा उल्लेख एकदा तरी झालेलाच दिसला. रणवीर आलिया,सारा-जान्हवी याच्या एपिसोडमध्ये तर कार्तिकची खिल्ली उडवली गेल्याचेच दिसून आले.

कॉफी विथ करण या शो मध्ये करण जोहर सिनेइंडस्ट्रीतील सेलिब्रिटीकंडून त्यांच्या करिअरसोबतच अनेक वैयक्तिक गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करताना दिसतो. आणि खरं तर त्यामुळेच शो चा टीआरपी अगदी पटकन वाढण्यास मदत होताना देखील दिसते. शो मधील रॅपिड फायर राऊंड हा सगळ्यात इंट्रेस्टिंग प्रकार.

कार्तिक आर्यन आणि सारा अली खानचे अफेअर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते. त्यामुळे करण जोहरने साराला शो मध्ये आल्यावर तिच्या लव्ह लाइफ विषयी विचारले. तेव्हा अर्थातच कार्तिकचा उल्लेख तर होणारच होता. करण जोहरने साराला विचारले होते की,''तुझा एक्स तुझा एक्स का आहे?'' तेव्हा उत्तर देताना सारा अली खान हसत हसत म्हणाली होती- ''कारण तो सर्वांचा एक्स आहे''. याच एपिसोडमध्ये कार्तिक आर्यन साराला डेट करत होता याविषयी स्पष्ट झालं होतं.

रणवीर सिंग आणि आलिया भट्टच्या एपिसोडमध्ये देखील रणवीरने कार्तिक आर्यनच्या चालण्याची स्टाईल,मीडियासमोर फोटोपोझ देतानाच्या स्टाईलची नक्कल करुन दाखवली होती. आता कार्तिक आर्यनने एका टॉक शो मध्ये याविषयी उल्लेख करताना नकळत करणच्या कॉफी विथ करण ७ या शो वर हसत-हसत का होईना चांगलाच निशाणा साधला आहे. त्याला विचारले गेले होते,'अशी कोणती गोष्ट आहे ज्याचा त्याला अभिमान आहे ?' त्यावर कार्तिक आर्यन म्हणाला,''तो रॅपिड फायर शो मध्ये खूपच प्रसिद्ध आहे,आणि याचा आपल्याला अभिमान आहे''. त्यावर एका चाहत्याने प्रतिक्रिया दिली आहे की- 'हाच प्रश्न आता करण जोहरला विचारायला हवा?' तर दुसऱ्या एका चाहत्यानं म्हटलं आहे की,'कार्तिकचा इशारा रणवीर सिंगच्या दिशेने किंवा सारा अली खानच्या दिशेने आहे'.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

IPL 2024, RCB vs GT: विराटचा जबरदस्त डायरेक्ट थ्रो, तर विजयकुमारचा सूर मारत भन्नाट कॅच, पाहा Video

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (०५ मे २०२४ ते ११ मे २०२४)

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

Sakal Podcast : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT