Pathaan- Shehzada Google
मनोरंजन

Shehzada Ticket: कार्तिकच्या 'शहजादा'नं लढवली शक्कल, बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या 'पठाण'ला अशी चारणार धूळ

'पठाण'च्या निर्मात्यांनी 'शहजादा' च्या वाटेत तिकीटाचे दर कमी करुन अडचणी निर्माण करु पाहिलं, पण कार्तिकच्या 'शहजादा' नं 'पठाण' चा वार पलटवून लावला आहे.

प्रणाली मोरे

Shehzada Ticket: शाहरुख खानचा 'पठाण' आता ५०० करोडच्या क्लबमध्ये एन्ट्री करणारा पहिला हिंदी सिनेमा बनला आहे. सिनेमाच्या निर्मात्यांनी आज देशभरातील मल्टीप्लेक्समध्ये सिनेमाचं तिकीट केवळ ११० रुपयात विकण्याची घोषणा केली आहे.

तर तिकडे 'शहजादा' सिनेमाच्या निर्मात्यांनी 'पठाण' च्या या ऑफर समोर टिकाव लागावा म्हणून आपल्या सिनेमाच्या एका तिकीटावर एक तिकीट फ्रीची ऑफर जाहीर केली आहे.(Kartik Aaryan Shehzada Ticket Offer ..pathaan slash ticket price)

गेल्या महिन्यात जेव्हा शाहरुख खानचा सिनेमा 'पठाण' रिलीज झाला होता,तेव्हा अनेकांनी तक्रार केली होती की सिनेमाच्या तिकीटीचे भाव एखाद्या थ्री डी सिनेमापेक्षा महाग आहेत. पण असं असलं तरी लोकांनी 'पठाण'ला इतका उत्स्फुर्त प्रतिसाद दिला होता,ज्यामुळे सिनेमानं आपल्या रिलीजपासून केवळ २२ दिवसांत ५०० करोडच्या क्लबमध्ये एन्ट्री करत इतिहास रचला.

या मोठ्या यशामुळेच आज निर्मात्यांनी मल्टीप्लेक्समध्ये 'पठाण डे' सेलिब्रेट करायचं ठरवलं. यामुळे आजच्या दिवशी देशभरातील कोणत्याही सिनेमागृहात 'पठाण' हा केवळ ११० रुपयात पाहता येणार आहे.

आता यामुळे कार्तिकच्या शहजादा समोर अडचणी निर्माण झाल्या.. नव्हे त्या निर्माण केल्या गेल्या. पण 'शहजादा'ची टीमही काही कमी नाही. त्यांनी देखील रातोरात निर्णय घेत आज रिलीजच्या पहिल्या दिवशी आपल्या सिनेमाची एकावर एक तिकीट फ्री अशी ऑफर घोषित केली.

आता पहायचं की या ऑफरचा 'शहजादा' सिनेमाला किती फायदा होतो.

आता 'पठाण'च नाही तर हॉलीवूडच्या 'ऐंट मॅन' सिनेमानंही आजच्याच दिवशी रिलीज होऊन शहजादा समोर अडचणींचा डोंगर उभा केला आहे. त्यात 'ऐंट मॅन' च्या तिकीट विक्रीत कमालीची वाढ झाल्याचं गुरुवारी रात्री म्हणजे १६ फेब्रुवारीला दिसून आलं.

'शहजादा'च्या अॅडव्हान्स बुकिंगवर या हॉलीवूडच्या सिनेमाचा परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे. कारण जिथे 'ऐंट मॅन'चे काल-परवा पर्यंत १,४६,४५२ तिकीट विकले गेले होते, तिथे 'शहजादा'च्या फक्त २५,७७० तिकीटी विकल्या गेल्या होत्या. आता पहायचं माऊथ पब्लिसिटीनं 'शहजादा' किती वेग धरतोय बॉक्सऑफिसवर.

तसंच, पहिल्या दिवशूीच्या ऑफरचा 'शहजादा'ला फायदा झाला तरी बॉक्सऑफिसवर त्याचे चांगले पडसाद उमटलेले दिसतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT