kartik aryan visit lalbaugcha raja 2023 and pray photos viral  SAKAL
मनोरंजन

Kartik Aryan: लालबाग राजाच्या चरणी कार्तिक आर्यन नतमस्तक, बाप्पाचं घेतलं दर्शन

कार्तिक आर्यनने गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी लालबाग राजाचं मनोभावे दर्शन घेतलं

Devendra Jadhav

Kartik Aryan at Lalbaugcha Raja: कार्तिक आर्यन हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. कार्तिकला आपण आजवर विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय.

कार्तिक गेल्या काही वर्षांपासुन चांगलाच चर्चेत आहे. त्याचा भूल भुलैया 2, सत्यप्रेम की कथा हे सिनेमे प्रचंड यशस्वी झाले. आज गणेश चतुर्थी निमित्त कार्तिकने लालबाग राजाचे मनोभावे दर्शन घेतले.

कार्तिक आर्यन लालबाग राजा चरणी नतमस्तक

कार्तिक आर्यनचे फोटो सोशल मिडीयावर चांगले व्हायरल झालेत. या फोटोत कार्तिक लालबाग राजाच्या चरणी नतमस्तक झालाय.

कार्तिकने भगव्या रंगाचा कुर्ता परिधान केलेला दिसून येतोय. कार्तिकने हात जोडून लालबाग राजाला नमस्कार केला अन् प्रार्थना केली.

कार्तिक आर्यनला पाहायला भाविक भक्तांची चांगलीच झुंबड उडाली होती. कार्तिकने पहिल्याच दिवशी सकाळी लवकर जाऊन लालबाग राजाचे दर्शन घेतले.

कार्तिक आर्यनचं वर्कफ्रंट

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा रोमँटिक ड्रामा चित्रपट 'सत्यप्रेम की कथा' थिएटरमध्ये प्रचंड गाजला होता. चित्रपटाचे दिग्दर्शक समीर विद्वांस आहेत.

बकरी ईदच्या मुहूर्तावर २९ जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता कार्तिक आगामी चंदू चॅम्पियन, भूल भूलैया 3 अशा सिनेमांमध्ये झळकणार आहे.

लालबागचा राजा तर्फे इर्शाळवाडीसाठी मदत

लालबागचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचे वैशिष्ट्य असणारा ‘पान-सुपारी’ कार्यक्रम २४ सप्टेंबर रोजी राजाच्या दरबारात होणार आहे. यंदा दरडग्रस्त इर्शाळवाडीतील पीडितांना मदत करून दुर्घटनेमध्ये मदत केलेल्या हातांचा सन्मान केला जाणार आहे.

मुंबईसह देश-विदेशातील गणेशभक्त श्री गणरायाची वाट बघत असतो. गणपती बाप्पाच्या अशा भक्तांसाठी मंडळाकडून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात.

‘पान-सुपारी’ हा त्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण आणि लालबागच्या राजाच्या परंपरेतील महत्त्वाचा कार्यक्रम असतो. ‘पान-सुपारी’मध्ये मंडळाकडून आपले सामाजिक दायित्व जपले जाते.

सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या व्यक्ती, सामाजिक संघटना यांचा सन्मान केला जातो. यंदा २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी हा कार्यक्रम राजाच्या दरबारात होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शक्तीचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका नाही, पण मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता; IMDने दिला इशारा

Crime News: अमेरिकेतील डल्लासमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या; हैदराबादच्या चंद्रशेखर पोलच्या मृत्यूने भारतात हळहळ

Latest Marathi News Live Update: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अहिल्यानगर दौऱ्यावर

Sakal Premier League : 5 नोव्हेंबरपासून 'सकाळ प्रिमिअर लीग'चा थरार; विजेत्या संघाला तीन लाखांचा पुरस्कार, ३२ संघ होणार सहभागी

PMC Elections : कोठे तक्रारींची दखल; कोठे राजकीय सोय, अंतिम प्रभागरचना जाहीर; इच्छुकांच्या नजरा आरक्षणाच्या सोडतीकडे

SCROLL FOR NEXT