Kasautii Zindagii Kay Charvi Saraf Says She Has Covid 19 Symptoms Is Unable To Get A Test  
मनोरंजन

या अभिनेत्रीला करोनाची लक्षणं, कोण आहे ती अभिनेत्री.. जिची करोना चाचणीच कोणी करेना

सकाळवृत्तसेवा

मुंबई :  ‘कसौटी जिंदगी की’चार्वीने प्रेरणाच्या बहिणीची भूमिका साकारली होती. २००३ मध्ये लोकप्रिय ठरलेल्या या मालिकेचा हा नवीन सिझन होता. यातील अभिनेत्री चार्वी सराफला गेल्या काही दिवसांपासून करोनाची लक्षणे जाणवत आहे. मात्र तरीही तिची चाचणी करण्यास कोणीही तयार नसल्याची तक्रार तिने यावेळी केली आहे. चार्वी सराफ ही सध्या दिल्लीत राहत आहे. यामुळे चार्वीने दिल्ली सरकारकडे मदतीची विनंती केली आहे.

तसेच यावेळी चार्वी असे म्हणाली की, जर एखाद्याला करोना चाचणी करण्यातच इतक्या अडचणी येत असतील तर सरकार लोकांना कशी मदत करणार? असा प्रश्न  सर्वांसमोर उपस्थित केला आहे.
चार्वीला ताप, घसा, डोकेदुखी आणि श्वसनाचा त्रास जाणवत आहे. सरकारी आणि खासगी रुग्णालयांनी तिला चाचणी करण्यास नकार दिल्याचं तिने सांगितले.

मला लक्षणं दिसू लागल्यावर मी करोना चाचणी करण्याचा विचार केला. लगेचच मी काही डॉक्टरांना फोन केला. त्यांच्याकडे कोविड 19 चे टेस्ट किट्स नसल्याचं मला सांगण्यात आलं. त्यानंतर काही खासगी व सरकारी रुग्णालयांना फोन केला. आमच्याकडे चाचणीची सुविधा नसल्याचं कारण देत त्यांनीसुद्धा थेट नकार दिला. माझी दिल्ली सरकारला विनंती आहे की मी सध्या घरातून निघून चाचणीसाठी कोणत्या रुग्णालयात जाऊ शकत नाही.

कृपया माझ्या घरी कोणीतरी यावं आणि करोनाची चाचणी करावी, असेही चार्वीने सांगितले.
जर एखाद्याला करोना चाचणी करण्यातच इतक्या अडचणी येत असतील तर दिल्ली सरकार पुढे लोकांना कशी मदत करणार हेच कळत नाही, असं म्हणत तिने सरकारच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : नाशिक जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात

Indian travelers in USA: भारतीय प्रवासी अमेरिकेत किती दिवस राहू शकतात? दूतावासाने जारी केल्या सूचना ; व्हिसावर अवलंबून नाही

Pune Cyber Crime: सायबर फसवणुकीतून कोटींची लूट; शहरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल

Pune Cold Weather: पुण्यात पुन्हा थंडीचा कडाका; किमान तापमान ८.१ अंशांवर, पहाटे गारठा

Maharashtra Cold Wave: : राज्यात पुन्हा थंडीची लाट, हुडहुडी वाढली; आज दिवसभरात कसे असेल हवामान? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT