Kate Winslet Update esakal
मनोरंजन

Kate Winslet Update: टायटॅनिकच्या 'रोझ'च्या प्रकृतीत सुधारणा!

केट सध्या क्रोएशियामध्ये दुसऱ्या महायुद्धातील एका विषयावर आधारित चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे.

सकाळ डिजिटल टीम

Kate Winslet News: टायटॅनिकमधील रोझच्या भूमिकेनं जगभरातील चाहत्यांच्या हदयात स्थान मिळवलेली अभिनेत्री केंट विन्स्लेट सध्या चर्चेत आली आहे. (Social Media Viral News) क्रोएशियामध्ये एका चित्रपटाची शुटींग करत असताना तिला अपघात झाला होता. त्यानंतर तातडीन तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. केटला झालेल्या दुखापतीनंतर चाहत्यांनी काळजी व्यक्त केली होती. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारुन केटनं आपल्या नावाची वेगळी छाप उमटवली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केटच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वी देखील एका चित्रपटाच्या शुटींगमध्ये केटला अपघात झाला होता. त्यातून ती पूर्णपणे बरी झाली होती. यानंतर तिला पुन्हा दुखापत झाली आहे. चाहत्यांनी केटला शुभेच्छा दिल्या आहेत. तिनं लवकर बरं होऊन पुन्हा सेटवर परतावं यासाठी देवाकडे प्रार्थनाही केली आहे.

क्रोएशियामध्ये केट ही एका चित्रपटाचे शुटींग करत होती. त्यावेळी तिच्या पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. केट ही ली नावाच्या सीरिजसाठी शुटींग करत आहे. हा चित्रपट प्रसिद्ध वॉर फोटोग्राफर ली मिलर यांच्यावर आधारित आहे. त्यांनी दुसऱ्या महायुद्धात केलेल्या कामाचे कौतूक झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT