vicky, katrina vicky, katrina
मनोरंजन

कतरिना आणि विकीच्या लग्नात ‘या’ दोघांवर राहणार सर्वांची नजर

सकाळ डिजिटल टीम

कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (vicky kaushal) ९ डिसेंबर रोजी लग्न (Marriage) करणार आहे. कुठे गेस्ट लिस्ट फायनल होत आहे तर कुठे सजावटीची तयारी सुरू आहे. विकी आणि कतरिना या दोघांनी आतापर्यंत ज्या कलाकारांसोबत काम केले आहे, त्या सर्वांना लग्नात बोलावणार असल्याची माहिती आहे. तसेच बॉलिवूडमधील मोठे कलाकार या विवाहात सहभागी होतील, अशीही चर्चा आहे. परंतु, या लिस्टमधील दोन नावांवर प्रत्येकाची नजर राहणार आहे. कोण आहे ते कलाकार हे आपण पाहणार आहोत...

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि दीपिका पदुकोण ही दोन नावं कतरिना कैफच्या आयुष्यात खूप जवळची आहेत. कतरिनाचे या दोन नावांशी खास नाते आहे. विशेषतः रणबीर कपूर. ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या चित्रपटात दोघेही पहिल्यांदा एकत्र दिसले होते. येथूनच त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली होती. दोघे ६ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघांच्या लग्नाच्या गोष्टीही सुरू झाल्या होत्या. परंतु, दोघांत असे काय झाले की ते वेगळे झाले याची कोणालाच कल्पना नाही.

कतरिनाच्या आधी रणबीर दीपिका पदुकोणला (Deepika Padukone) डेट करीत होता. मात्र, रमबीरच्या आयुक्यात कतरिना आली आणि दीपिकापासून दूर झाला. यामुळेच दीपिका आणि कतरिनाचे नातेही फारसे चांगले नाही. यामुळे कतरिना या दोघांना लग्नाचे आमंत्रण देते की नाही आणि दिले तर दोघे लग्नात सहभागी होते की नाही, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

७ डिसेंबरपासून या लग्नाचे सोहळे

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचे लग्न ९ डिसेंबर रोजी सवाई माधोपूरच्या फोर्ट बरवाडा येथे होणार आहे. ७ डिसेंबरपासून या लग्नाचे सोहळे सुरू होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT