Kaun Banega Crorepati 14 contestant goes shirtless,amitabh bachchan shocked  Google
मनोरंजन

KBC: स्पर्धकानं चक्क अमिताभसमोर अंगातला शर्ट दिला भिरकावून, पुढे जे घडलं ते...

गुजरातहून आलेले स्पर्धक डॉ.विजय गुप्ता यांनी अमिताभसमोर अंगातला शर्ट काढत अजब प्रकार केला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

प्रणाली मोरे

KBC 14: अमिताभ बच्चनचा(Amitabh Bacchan) कौन बनेगा करोडपती(Kaun Banega Crorepati) शो ची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या २२ वर्षात या गेम शो चे १४ सीझन आपल्या भेटीस आले. इथे ज्या स्पर्धकाला येण्याची संधी मिळते त्याच्या आनंदाला तर पारावरच उरत नाही. अमिताभ बच्चन यांच्यासमोर स्वतःला बसण्याची संधी मिळाली यात धन्यता मानत भावूक होतानाही स्पर्धक दिसतात. पण आता केबीसी मध्ये असं काही घडलं जे पाहिल्यानंतर अमिताभ दंग झाले. केबीसीच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये विजय गुप्ता या स्पर्धकानं फास्टेस्ट फिंगर फर्स्ट राऊंड जिंकल्यानंतर सगळ्यांसमोर स्वतःचा शर्ट काधून भिरकावून दिला. ते अंगावर फक्त बनियान ठेवून,शर्ट हातात घेऊन सेटच्या भोवती गोल चक्कर मारत धावायला लागले, एवढंच नाही तर प्रेक्षकांत बसलेल्या पत्नीची देखील गळाभेट घेतली.(Kaun Banega Crorepati 14 contestant goes shirtless,amitabh bachchan shocked)

हॉटसीट वर बसायला मिळणं यासाठी एवढा आनंद झालेला आतापर्यंत कोणामध्येच पहायला मिळाला नव्हता. विजय गुप्ता यांना शर्टलेस पाहून खुद्द अमिताभ बच्चनही दंग झाले. यापेक्षा देखील मजेदार गोष्ट ही घडली की शर्ट काढल्यानंतर,सेटला चक्रा मारल्यानंतर,पत्नीची गळाभेट घेतल्यानंतर विजय गुप्ता शर्टलेस होऊन अमिताभ बच्चन यांच्यासमोर जाऊन उभे राहिले. अमिताभ बच्चन तेव्हा त्यांच्याकडे एकटक पाहत राहिले. आणि मग थोड्या खट्याळपणे अमिताभ म्हणाले,'सही आहे सर,सही'. त्यानंतर त्यांनी स्पर्धक विजय गुप्ता यांना शर्ट परिधान करण्यास सांगितले. पण त्यानंतरही अमिताभ विजय गुप्ता यांची थोडी मस्करी करत म्हणाले, ''शर्ट लवकर घाला,मला भीती वाटतेय इतर कोणते कपडे अंगावरनं निघतील याचा नेम नाही.''

गोष्ट इकडेच संपली नाही, विजय गुप्ता शर्ट घातल्यानंतर माइक सेट करायला बॅक स्टेजला गेले,तेव्हा त्यांच्या मागे मागे अमिताभही गेले. अर्थात,आता ज्या उत्साहाने विजय गुप्ता यांनी शर्ट काढला होता,तेवढा दम किंवा उत्साह त्यांच्या खेळात दिसला नाही. त्यांनी फक्त १० हजार रुपये जिंकले. पण सोशल मीडियावर मात्र विजय गुप्ता यांच्या उत्साहाची भलतीच चर्चा रंगलेली दिसतेय. शो च्या मेकर्सनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे,ज्यावर भरभरुन कमेंट्स पडत आहेत. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे,'सुपरहिट भैय्याजी'. आणखी एकानं लिहिलं आहे, 'यांना वेड लागलं आहे वाटतं'.

दुसरीकडे आता बातमी आहे, ७९ वर्षाचे अमिताभ सध्या कोरोनाबाधित झाल्यानं ब्रेकवर आहेत. ते घरातच आइसोलेशनमध्ये आहेत. त्यांनी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून हेल्थ अपडेट दिली आहे. त्यात त्यांनी 'कोरोना जिंकला..' असं म्हटल्यानं त्यांचे चाहते चिंतेत पडले आहेत. अमिताभनी त्या ब्लॉगमध्ये डॉक्टर्स आणि महानगपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. आता बातमी आहे की अमिताभ 'कौन बनेगा करोडपती'च्या सेटपासून काही दिवस दूर राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmers Protest: 'उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध'; शेतकऱ्यांकडून रास्तारोको, उपकाराची भाषा थांबवावी

दहावी-बारावीच्या परीक्षेपूर्वी बोर्डाचा मोठा निर्णय! परीक्षा केंद्रावरील प्रत्येक वर्गात आता सीसीटीव्ही असणार, शाळेची संरक्षक भिंत पक्की असण्याचीही घातली अट

Inspiring Woman: 'पोटात वाढणाऱ्या बाळासह राधिका नरळेंची प्रेरणादायी धाव'; सोलापूरमधील ‘१० के रन’ मॅरेथॉनमध्ये गरोदर असूनही ५ किलोमीटर धावल्या..

Panchang 3 November 2025: आजच्या दिवशी चंद्रकवच स्तोत्र पठण व ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

Laxman Hake: दोन सप्टेबरचा जीआर रद्द करा: लक्ष्मण हाके; आरक्षणाशी संबंध नसणारे विखे उपसमितीचे अध्यक्ष कसे?, दहा टक्क्यांना सरकार घाबरले

SCROLL FOR NEXT