kaun Banega Crorepati 14 First crorepati kavita Chawla,Kolhapur Contestant.Amiabh Bachchan quiz show.  Google
मनोरंजन

KBC14:कोल्हापूरची 'हाउसवाईफ' बनली पहिली करोडपती,कविता चावला जिंकणार का 7.5 करोड?

'कौन बगेगा करोडपती 14' चा नवीन प्रोमो व्हायरल झाला आहे. या प्रोमो व्हिडीओतूनच सिझनचा पहिला करोडपती मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे.

प्रणाली मोरे

KBC 14: अमिताभ बच्चनचा शो 'कौन बनेगा करोडपती 14' सीझनला स्पर्धकांमधून पहिला करोडपती मिळाला आहे. हा करोडपती एक महिला स्पर्धक आहे,जी महाराष्ट्राच्या कोल्हापूरमध्ये राहणारी आहे. गृहिणी असलेल्या कविता चावला केबीसी 14 सीझनच्या पहिल्या करोडपती बनल्या आहेत,ज्यांनी 1 करोड जिंकून रेकॉर्ड बनवला आहे. (kaun Banega Crorepati 14 First crorepati kavita Chawla,Kolhapur Contestant.Amiabh Bachchan quiz show.)

'कौन बगेगा करोडपती 14' चा नवीन प्रोमो व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतूनच ही माहिती देण्यात आली आहे. तसंच या प्रोमोत हे देखील दाखवलं गेलं आहे की कविता चावला केबीसी च्या शेवटच्या प्रश्नावर पोहोचल्या आहेत,ज्या प्रश्नाचं बरोबर उत्तर देऊन त्या 7.5 करोड जिंकतील.

'कौन बनेगा करोडपती 14' च्या प्रोमोची सुरुवातच कविता चावला यांच्या 1 करोड जिंकण्याने होते. आता त्या 17 व्या प्रश्नाचं उत्तर बरोबर देणार, जो प्रश्न 7.5 करोड रुपये त्यांना जिंकून देईल. सगळ्यात खास गोष्ट ही आहे की,कोल्हापूरहून आलेल्या कविता चावला एक गृहिणी असूनही त्यांनी खूप हुशारीनं खेळ खेळत 1 करोड जिंकून इतिहास रचला आहे. आता पहायचं की त्या 7.5 करोडच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर देतात की नाही.

या प्रोमोला शेअर करताना केबीसीच्या मेकर्सनी सांगितले आहे की,कविता चावला या गृहिणी आहेत. आणि त्या 1 करोड जिंकल्या आहेत. कविता करोडपती बनल्या हे जसं व्हायरल झालं तसं सोशल मीडियावर त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे. सगळे त्यांनी 7.5 करोड आता जिंकावेत अशा शुभेच्छा देत आहेत.

कौन बनेगा करोडपती 14 मध्ये कविता चावला यांच्या आधी आणखी एक महिला स्पर्धक 1 करोडच्या प्रश्नापर्यंत पोहोचली होती. केरळची डर्माटोलॉजिस्ट अनु यांनी अमिताभ यांच्यासमोर हॉट सीटवर बसून 1 करोडपर्यंत खेळ खेळला होता. अर्थात त्या या प्रश्नाचं उत्तर देऊ शकल्या नव्हत्या,आणि करोडपती बनता बनता राहिल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT