KBC 14: 75 lakhs sure even after not being able to answer the question of 7.5 crores Google
मनोरंजन

KBC 14:घाबरायचं कारण न्हाई,कोटी गेले तरी लाख खिशात;'हा' आहे KBC चा नवा नियम

'कौन बनेगा करोडपती -14' येत्या ऑगस्ट महिन्यापासून सुरु होणार असल्याचं बोललं जात आहे.

प्रणाली मोरे

गेल्या १४ वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करणारा आणि त्यांच्या जनरल नॉलेजमध्ये भर घालणारा शो म्हणजे 'कौन बनगे करोडपती'. हा शो लवकरच सुरु होत आहे. चाहते या क्वीझ शो ची मनापासून वाट पाहताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) केव्हा हॉट सीटवर बसतील अन् स्पर्धकाला विचारतील की 'लॉक कर दिया जाए...' याची देखील चाहत्यांना उत्सुकता आहे. शो लवकरच सुरु होतोय,त्यासंदर्भातल्या अपडेट्स समोर आल्या आहेत. यामध्ये तो किती तारखेला टी.व्ही वर येतोय आणि नवीन यंदा काय काय असणार आहे यासंदर्भात चला जाणून घेऊया.(KBC 14: 75 lakhs sure even after not being able to answer the question of 7.5 crores)

सोनी टी.व्ही वर येणारा आपल्या सर्वांचा लाडका शो 'कौन बनेगा करोडपती सिझन 14' चा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. यामध्ये अमिताभ बच्चन आणि स्पर्धक दोघंही हॉट सीटवर विराजमान झालेले दिसत आहेत. व्हिडीओ मध्ये आपण पाहू शकाल की बिग बी स्पर्धकाला म्हणतात की,''तुम्ही एक करोड जिंकलेले आहात. तुम्ही आता पुढे खेळण्यास इच्छुक आहात की नाही?'' हे ऐकल्यावर स्पर्धक विचारात पडलेला दिसत आहे. स्पर्धकाला यावेळी आपल्या जवळच्या लोकांनी दिलेले सल्ले आठवतो. जे मिळालंय त्यावर समाधान मान नाहीतर पुढचा प्रश्न चुकल्यावर फक्त साडे तीन लाखावर येशील परत''.

मग अमिताभ बच्चन पुढे बोलतात,''जर तुम्ही पुढे खेळलात,उत्तर बरोबर दिलं तर तब्बल ७.५ करोड जिंकाल. पण दुर्भाग्यानं जर उत्तर चुकलंच तरी ७५ लाख पक्के मिळणार''. हे ऐकल्यावर समोर बसलेला स्पर्धक चकीत होतो. त्यानंतर मग अमिताभ बोलतात की'' भारत यावर्षी स्वातंत्र्याची ७५ वर्ष साजरी करीत आहे,त्यानिमित्तानं केबीसी मध्ये देखील एक नवं वळण येतंय. जे आहे ७५ लाख रुपयांचे. म्हणजे तुम्ही साडे सात करोडवर जर डगमगलात तरी आपल्याला साडे तीन लाख नाही तर ७५ लाख मिळणार आहेत.

आता तुम्हाला माहिती देतो ते शो कधी सुरु होणार यासंदर्भात. एका इंग्रजी वेबसाईटशी केलेल्या बातचीत मध्ये 'मोसे छल किए जाए' फेम विधी पंड्यानं सांगितलं आहे की त्यांचा शो लवकरच ऑफ एअर जात आहे. या शो चा शेवटचा भाग 5 ऑगस्ट 2022 रोजी प्रसारित केला जाईल. त्यादिवशी शुक्रवार आहे,आणि नंतर 6,7 तारखेला शनिवार,रविवार. त्यामुळे 8 ऑगस्ट रोजी 'कौन बनेगा करोडपती 14' सुरु होणार असल्याची शक्यता नाकारु शकत नाही. अद्याप यावर कोणतीही अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. पण सोनीचा महत्त्वाचा 9.30 चा स्लॉट रिकामा झाल्यावर केबीसी ला तो मिळू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates :दोन गट हातात कोयता घेऊन आमनेसामने; पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला

Nagpur News : ऑनलाइन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश; २० कोटींचे व्यवहा, छत्तीसगढ पोलिसांकडून नागपुरात सहा जणांना अटक

बाहुबली: द बिगिनिंगला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत, आता बाहुबली: द एपिक रिलीज होणार 'या' तारखेला !

Success Story: पेंडकापारचा ‘आशीर्वाद’ चमकला शिकागोमध्ये; प्रतिकूल परिस्थितीवर केली मात बेला परिसरात कौतुक

Thane Rickshaw Driver Girl Video: भाडे नाकारले, हात उचलला, ठाण्यात रिक्षाचालकाची मुजोरी | Sakal News

SCROLL FOR NEXT