KBC 14: Contestant Ask Amitabh, if amitabh repeat his clothes?read what amitabh said Instagram
मनोरंजन

KBC14:स्पर्धकानं विचारलं,'तुमचे कपडे कोण धुतं, कपडे रिपीट करता का?; उत्तर देत अमिताभनी मारला सिक्सर

'कौन बनेगा करोडपती'चा यंदाचा सिझन स्पर्धक आणि अमिताभ बच्चन यांच्यातील खुसखुशीत संवादामुळे अधिक रंजक बनत चालला आहे.

प्रणाली मोरे

KBC 14: 'कौन बनेगा करोडपती'मधील स्पर्धक आणि अमिताभ बच्चन यांच्यात नेहमीच लक्ष वेधून घेतील असा संवाद झालेला पहायला मिळतो. बिग बी नेहमीच स्पर्धकांना खुलवण्यासाठी खुसखुसशीत प्रश्न विचारताना दिसतात. यावेळी स्पर्धक पिंकीनं प्रश्नोत्तरांच्या दरम्यान अमिताभ बच्चन यांना बॉलीवूड सेलिब्रिटींसंदर्भात प्रश्न विचारला. पिंकीनी विचारलं, 'बिग बी तुम्ही तुमचे कपडे रिपीट करता का आणि तुमचे कपडे कोण धुतं?' यावर अमिताभ बच्चन यांनी देखील मजेदार अंदाजात उत्तर दिलं. (KBC 14: Contestant Ask Amitabh, if amitabh repeat his clothes?read what amitabh said)

अमिताभ बच्चन यांनी शो ची सुरुवात स्पर्धक मधुपासून केली. मधूनं ३,२०,००० रुपये जिंकले. पण ६,४०,००० रुपयांसाठीचं उत्तर मधू देऊ शकल्या नाहीत. मधू नंतर पिंकी नावाच्या स्पर्धक हॉट सीटवर बसल्या. हॉटसीटवर बसायची संधी मिळाल्यामुळे पिंकी यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. त्यावेळी सुरुवातीला अमिताभ बच्चन यांनी पिंकी यांना पाणी पिण्यास दिले. प्रश्नोत्तरांचा सिलसिला सुरु असतो तितक्यात पिंकी अमिताभ बच्चन यांच्यासमोर आपल्या मनातील एक गोष्ट बोलून दाखवतात. त्या अमिताभना बोलून दाखवतात की,'सेलिब्रिटी आपले कपडे रिपीट करत नाहीत आणि स्वतः स्वतःचे कपडे धूतही नाहीत, असं माझं ठाम मत आहे'.

यावर अमिताभ बच्चन उत्तर देताना म्हणतात की, ''ही चुकीची माहिती मिळालीय तुम्हाला. कारण मी रोज माझे कपडे स्वतः धूतो. फक्त शूट दरम्यानच मी फॅन्सी,चांगले कपडे घालतो बाकी इतर वेळेला मी नेहमीच माझे कपडे रिपीट करतो आणि ते खूपच साधे असतात. भडकपणा त्यात नसतो''.

पुढच्याच आठवड्यात अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस आहे. अमिताभ ८० वर्षांचे होत आहेत. बर्थ डे स्पेशल एपिसोडमध्ये त्यांना मोठं सरप्राइजही मिळणार आहे, या स्पेशल भागात त्यांचा मुलगा अभिषेक आणि पत्नी जया बच्चन पोहोचणार आहेत. आणि अर्थातच अमिताभ त्यांना पाहून भावूक होणार यात शंकाच नाही. शो चे प्रोमो समोर आले आहेत आणि ते पाहिल्यानंतर लोकांना आता अमिताभ यांच्या बर्थ डे चा तो स्पेशल एपिसोड पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT