KBC 14 esakal
मनोरंजन

KBC 14 : 'तू नुसताच बर्गर खातोस तर मग कतरिना काय करते?' नेटकऱ्यांचा विकीला प्रश्न

पिझ्झा, बर्गरचं नाव समोर येताच विकीच्या तोंडाला पाणी सुटते. त्याला जंक फुड कमालीचे आवडते.

सकाळ डिजिटल टीम

KBC 14 : पिझ्झा, बर्गरचं नाव समोर येताच विकीच्या तोंडाला पाणी सुटते. त्याला जंक फुड कमालीचे आवडते. कौन बनेगा करोडपतीच्या शो मध्ये अमिताभ बच्चन यांच्या समोर हॉट सीटवर बसल्यावर विकीला जेव्हा त्याच्या खानपानावरुन प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्यानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

विकी तू वजन कमी करण्यासाठी काय करतोस, असा प्रश्न बिग बी अमिताभ बच्चन यांनी विचारला होता. त्या प्रश्नाचे उत्तर देताना विकी म्हणाला, मी खूप बोरिंग जेवण जेवतो. त्याला कोणतेही बंधने नाही. मी बर्गरही खातो. त्याचवेळी कियारा त्याला अशाप्रकारचे जेवण जेवल्यानं तुझं वजन वाढत नाही का असा प्रश्न विचारते. तेव्हा तर विकीला काहीच बोलता येत नाही. विकीचा तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Also Read - जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

विकीच्या त्या प्रतिक्रियेवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं तर विकी तुला जर अशाप्रकारचे जेवण करावे लागत असेल तर मग कतरिना घरात करते काय असा प्रश्न विचारला आहे. नेटकऱ्यांनी विचारलेल्या त्या प्रश्नावरही अनेकांनी गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

विक्की म्हणतो की, लोकं जिममध्ये जातात. मलाही जिम करायला आवडते. गेल्या काही दिवसांममध्ये मी माझे वजन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वर्क आऊट आणि डाएट प्लॅन केला आहे. बऱ्याचशा गोष्टी या डाएट प्लॅनवर आधारित आहे. हे अनेकांना सांगून लक्षात येत नाही. विकी बर्गर खाऊन कुणी वजन कमी करतं का, असा प्रश्न अमिताभ यांनी यावेळी विचारताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP PM Candidate Announcement for 2029 : २०२९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा PM पदाचा चेहरा ठरला! बैठकीत अमित शाहांनी अचानक जाहीर केलं 'हे' नाव; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ!

Marathi News Live Updates : सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध

IND vs NZ, 4th T20I: टीम इंडियाचं नेमकं काय चुकलं? कर्णधार श्रेयस अय्यरने स्पष्टच सांगिलतं; फिलिप्सचंही केलं भरभरून कौतुक

Maharashtra School Diwali Vacation District Wise : शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांबाबत पालकांमध्ये संभ्रम; तुमच्या जिल्ह्यात शाळा कधी बंद होणार अन् कधी सुरू? पाहा जिल्ह्यानिहाय संपूर्ण यादी!

CBSE Class 10 Syllabus Change: 'सीबीएसई'च्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल! दहावीच्या अभ्यासक्रमातून 'पर्यावरण शिक्षण' विषय वगळला, व्यावसायिक शिक्षण अनिवार्य

SCROLL FOR NEXT