Kedar Shinde Birthday kedar shinde want to change his surname in struggle period shinde to sable sakal
मनोरंजन

Kedar Shinde Birthday: केदार शिंदे यांना बदलायचं होतं आडनाव.. कारण..

एकेकाळी स्ट्रगल काळात केदार शिंदे यांनी 'शिंदे' ऐवजी 'या' आडनावासाठी केला होता आटापिटा..

सकाळ डिजिटल टीम

kedar shinde : महाराष्ट्रातील एक हरहुन्नरी दिग्दर्शक म्हणजे केदार शिंदे. नाटक, मालिका असो किंवा चित्रपट. केदार शिंदे यांचा प्रॉजेक्ट आहे म्हणजे सगळ्यांचे डोळे तिथेच लागलेले असतात. आज केदार शिंदे ही नाव महाराष्ट्रातच नाही तर जगभरात पोहोचलेलं आहे. त्याचे चित्रपट सातासमुद्रापार गाजले आहेत. अशा या दिग्दर्शकाचा आज पन्नासावा वाढदिवस. त्यानिमित्ताने जाणून घेऊया ही खास बात..

(Kedar Shinde Birthday kedar shinde want to change his surname in struggle period shinde to sable)

केदार शिंदे हे (kedar shinde)नाव अवघ्या मनोरंजन विश्वाला परिचित असलं तरी ही ओळख त्यांना सहज मिळाली नाही. त्यासाठी अपार मेहनत केदार यांनी घेतली आहे. अगदी आजोबा शाहीर साबळे इतके मोठे शाहीर असतानाही त्यांना स्ट्रगल चुकला नाही. मात्र या काळात आपलं आडनाव चुकलंय ही मात्र केदारला सातत्याने वाटत होतं.

त्याचं कारणही तसंच आहे. केदारच्या बरोबरीचे सर्व मित्र मनोरंजन विश्वात पुढे जात होते. पण केदारला मात्र मनासारखे काम मिळत नव्हते. त्यावेळी नाट्यसृष्टीत लगेच लेखक,दिग्दर्शक म्हणुन काम मिळणं सोप नव्हतं. पण केदार मात्र मिळेल ते काम करायला तयार असायचे.

रंगभुमी हा त्यांचा प्राण होता त्यामुळे ते त्यासाठी काहीही करायला तयार होते. या काळात त्यांची पत्नी बेलानेही त्यांना प्रचंड साथ दिली. संसार गाडा सांभाळण्यासाठी थोडे दिवस बेला शिंदे यांनीही पुरुषोत्तम बेर्डे यांच्या " जाऊ बाई जोरात " नाटकात काम केले.

पण एक दिवस असा आला की, केदार शिंदे यांचं " बॉम्ब ए मेरी जान " हे नाटक सुमीत राघवन आणि चिन्मयी सुमीत ला घेऊन रंगभुमीवर आलं. मात्र या नाटकाला फारस यश मिळालं नाही. पुढे मोहन जोशी निर्मीतीक्षेत्रात उतरले आणि त्यांनी आपल्या संस्थेतर्फे केदार यांचं " मनोमनी " हे नाटक रंगभुमीवर आणायच ठरवलं आणि ही नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं देखील. याच नाटका पासून केदार शिंदे हे नाव प्रेक्षकांच्या ओळखीच झालं.

पुढे नाटका सोबतच ही नाव मालिका विश्वात आलं आणि अल्फा मराठीवरील त्यांच्या 'हसा चकट फू' नं धुमाकूळ घातला. पुढे त्यांनी "तु तु मी मी", "अनुदिनी" असे अनेक धाडसी प्रयोग केले. आणि ''अगं बाई आरेच्चा"नं तर केदार शिंदे नावाची ख्याती कुठच्या कुठे नेली. पण या सगळ्यात सुरवतीच्या काळात अनेकदा त्यांना आपलं आडनाव बदलावंसं वाटलं.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

ते आडनाव होतं 'साबळे..' आपले आजोबा शाहीर साबळे यांना अख्खा महाराष्ट्र ओळखत होता. पार गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत त्यांची पोहोच होती. साबळे आडनावाला तेव्हा प्रचंड किंमत होती. पण केदार नातू असला तरी तो मुलीचा मुलगा असल्याने त्यांचे आडनाव शिंदे होते. त्यामुळे अनेकांना मी त्यांचा नातू अशी ओळख करून द्यावी लागायची. जर माझंही आडनाव साबळे असतं तर किती बरं झालं असतं, अशी खंत त्यांना कायम वाटायची. पण पुढे केदार इतके यशस्वी झाले की शिंदे आडनाव सार्थकी लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

सुलतानला नऊ वर्षं पूर्ण ! सलमानने सिनेमासाठी स्वतःमध्ये घडवलेले हे पाच बदल

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

SCROLL FOR NEXT