kedar shinde shared post about ajay atul and maharashtra shahir movie on shahir sable cast sana shinde  sakal
मनोरंजन

Kedar Shinde: १७ वर्षांनंतर.. केदार शिंदेंनी सांगितलं अजय-अतुल सोबतचं खास नातं

महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाच्या निमित्ताने केदार शिंदे यांनी ही खास पोस्ट केली आहे.

नीलेश अडसूळ

kedar shinde: दिग्दर्शक केदार शिंदे (kedar shinde) यांनी आजवर रंगभूमीवर भरीव योगदान दिले आहे. त्यांची नाटकं असो किंवा चित्रपट, प्रेक्षक भान हरपून त्यात समरस होतो. आजोबा शाहीर साबळे यांच्याकडून आलेला लोककलेचा वारसाही त्यांनी जपला आहे. शाहीर साबळे यांचे जीवनावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर' (maharashtra shahir) हा त्यांचा चित्रपट लवकरच प्रेक्षक भेटीला येणार आहे. याच चित्रपटाचे औचित्य साधून त्यांनी एक खास पोस्ट केली आहे.

(kedar shinde shared post about ajay atul and maharashtra shahir movie on shahir sable cast sana shinde)

या चित्रपटात शाहीर साबळे यांची भूमिका अभिनेता अंकुश चौधरी करत आहेत तर शाहीर साबळे त्यांच्या पत्नीची म्हणजेच भानुमती कृष्णराव साबळे यांची भूमिका केदार शिंदे यांची लेक सना शिंदे साकारणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाला संगीत दिग्दर्शक 'अजय- अतुल' यांचे संगीत लाभले आहे. अजय-अतुल आणि केदार शिंदे (kedar shinde) यांचे एक खास नाते आहे, खास कनेक्शन आहे. जवळपास १२ वर्षांनी ते एकत्र काम करत आहेत. म्हणून आज केदार शिंदे यांनी अजयअतुल यांच्यासाठी एक खास पोस्ट केली आहे.

केदार यांनी लिहिले आहे की, 'महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा संगीतावर अवलंबून आहे. अजय अतुल (ajay-atul) यांच्यासोबत १७ वर्षांनंतर काम करण्याचा योग जुळून आला आहे. बहूतेक हे विधी लिखित होतं. पहिला सिनेमा "अगं बाई अरेच्चा" यातलं "मल्हारंवारी" हे गीत शाहीरांनी गाऊन अजरामर केलं. त्यांच्या सिनेमासाठी अजरामर संगीत देण्यासाठी अजय अतुल आणि मी एकत्र आलोय. माझ्या लेकीच्या पहिल्या सिनेमाच्या, पहिल्या वहिल्या गाण्याला सुध्दा त्यांनीच संगीत द्यावं?? उत्सुक आहे पुढे तुमच्यासमोर संगीत आणण्यासाठी!!'

केदार शिंदे यांची ही पोस्ट सध्या बरीच चर्चेत आहे. विशेष म्हणजे अजय अतुल यांचे संगीत असल्याचे चित्रपटाबाबतची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली आहे. अजय अतुल या चित्रपटात नेमकी के जादू करणार हे पाहण्यासाठी सर्वजण या चित्रपटाची वाट पाहत आहे. २८ एप्रिल २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: धक्कादायक! आठवीतील मुलगी गर्भवती राहिली; वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना माहितीच नाही, नंतर... जे घडलं त्यानं सगळेच हादरले

Latest Marathi News Live Update: सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

IND vs NZ, 5th T20I: संजू सॅमसनने शेवटची संधीही गमावली, घरच्या मैदानातही स्वस्तात आऊट

Tax-Free Nations : कराच्या स्वरूपात ‘या’ देशांमध्ये जनतेकडून एकही रुपया केला जात नाही वसूल!

प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या निर्मिती सावंत झाल्या आजी; नात की नातू? स्वतः केला खुलासा

SCROLL FOR NEXT