kedar shinde shared post about drone camera on set of maharashtra shahir movie  sakal
मनोरंजन

ह्या वेळी सोबत होता एक नवा प्रवासी.. केदार शिंदे यांची खास पोस्ट..

केदार शिंदे यांच्या आगामी 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यानचा अनुभव त्यांनी सांगितला आहे.

नीलेश अडसूळ

Entertainment news : दिग्दर्शक केदार शिंदे (kedar shinde) यांनी आजवर रंगभूमीवर भरीव योगदान दिले आहे. त्यांची नाटकं असो किंवा चित्रपट प्रेक्षक भान हरपून त्यात समरस होतो. आजोबा शाहीर साबळे यांच्याकडून आलेला लोककलेचा वारसाही त्यांनी जपला आहे. शाहीर साबळे यांचे जीवनावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर' (maharashtra shahir) हा त्यांचा चित्रपट लवकरच प्रेक्षक भेटीला येणार आहे. सध्या ते 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटाच्या तयारीला लागले असून लवकरच चित्रीकरण सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वी ते चित्रीकरणस्थळ म्हणजेच लोकेशन फायनल करायला सातारा, वाई, पुणे परिसरात फिरत होते. त्यादरम्यान चित्रित केलेला एक विडिओ आणि सोबत एक भन्नाट पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. (kedar shinde shared post about drone camera on set of maharashtra shahir movie)

शाहीर साबळे यांचे सातारा जिल्हयाशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ते स्वतः वाई तालुक्याचेच असल्याने त्यांचे बालपण आणि पुढे बराचसा काळ हा साताऱ्यातच गेला आहे. लवकरच त्यांच्या जीवनावर त्यांचा नातू केदार शिंदे चित्रपट करत आहे. त्यासाठी लोकेशन ही महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याच शोधत दिग्दर्शक केदार शिंदे संपूर्ण टीम घेऊन सातारा जिल्ह्यात गेले होते. यावेळी त्यांनी अनेक ठिकाणं लोकेशनसाठी पाहिली. त्यातली काही ठिकाणं अंतिम केली. ते करताना सध्याच्या तंत्रज्ञानातील 'ड्रोन' कॅमेऱ्याने त्यांना अनेक मनमोहक दृश्ये दाखवली, म्हणून त्यांनी ड्रोन मधून टिपलेला एक व्हिडओ शेयर केला आहे. याला एक सुंदर कॅप्शनही त्यांनी दिले आहे. (new marathi movie shahir sable)


केदार म्हणतात, 'सिनेमाच्या प्रवासामध्ये योग्य लोकेशन (चित्रीकरण स्थळ) मिळवणे खूप महत्वाचे असते.. मागे त्यासाठीच आम्ही सातारा आणि पुणे ह्या भागात महाराष्ट्र शाहीर ह्या सिनेमासाठी लोकेशन्स बघायला गेलो होतो.. त्याचीच पुढची पायरी म्हणून चित्रीकरणा आधी पुन्हा एकदा त्या स्थळांची तांत्रिक पाहणी करायला ह्या महिन्यात जाण्याचा योग आला.. ह्या वेळी सोबत होता एक नवा प्रवासी.. ड्रोन.. ह्या उडत्या कॅमेऱ्याने आजूबाजूची सगळी इत्यंभूत माहिती आम्हाला मिळाली.. चित्रीकरणाची पूर्वतयारी म्हणून हे एक महत्वाचं पाऊल होतं.. ह्या उडत्या कॅमेरा द्वारे आम्हाला पाहायला मिळालेल्या काही विहंगम दृष्यांपैकी ही काही खास तुमच्यासाठी.. ' महाराष्ट्र शाहीर' २८ एप्रिल २०२३ पासून तुमच्या नजीकच्या सिनेमागृहात!!'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : हातात पिस्तूल घेऊन ‘किंग ऑफ शिरूर’ची रील व्हायरल; दहशत निर्माण करणाऱ्या प्रकारावर पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई कधी?

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT