kedar shinde shared video about his jatra marathi movie shooting village in satara how looks after 17 years
kedar shinde shared video about his jatra marathi movie shooting village in satara how looks after 17 years sakal
मनोरंजन

Kedar Shinde:गाव बदललं! 'जत्रा'मधलं गाव आज 17 वर्षांनी असं दिसतंय.. व्हिडिओ बघाच

नीलेश अडसूळ

'ह्यालगाड' आणि 'त्यालागाड'ची जत्रा सतरा वर्षांपूर्वी आपल्या भेटीला आली. केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेला 'जत्रा' हा चित्रपट आजही आपल्या स्मरणातून गेलेला नाही. त्यातले संवाद, गाणी, कलाकार सगळंच कसं आजही जीवंत आहे. कोंबडी पळाली गाणं, कान्होळे, अलबत्या गलबत्या कोण फोडील खलबत्या, तुमचा ताब्या आमच्या राजुत आहे असे काही संवाद आणि कितीतरी गोष्टी काल परवा घडून गेल्या सारख्या वाटतात. त्या चित्रपटात आणखी एक गोष्ट आपल्याला भुरळ घालून गेली ते या चित्रपटातलं गाव. सातारा जिल्ह्यातील हे गाव आज 17 वर्षांनी बरच बदललं आहे. त्याचाच एक खास व्हिडिओ समोर आला आहे.

(kedar shinde shared video about his jatra marathi movie shooting village in satara how looks after 17 years)

केदार शिंदे (kedar shinde) सध्या एकामागून एक चित्रपटांची घोषणा करत आहेत. काही दिवसातच त्यांचा 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, तर 2023 मध्ये शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर'हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, दरम्यान त्यांनी 'जत्रा' चित्रपटाचा दूसरा भाग म्हणजे 'जत्रा 2' ही लवकरच येणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे याही चित्रपटाकडे सर्वांचे लक्ष लगले आहे. पण केदार शिंदे यांनी आज पुन्हा एकदा 'जत्रा' चित्रपटातील गावाची आठवण करून दिली.

एक व्हिडिओ शेयर करत ते म्हणतात, '२८ ऑक्टोबर २००५ साली जत्रा रिलीज झाला होता.. ह्या २८ ला १७ वर्ष झाली त्या दिवसाला.. एक तो दिवस आहे आणि एक आजचा.. ह्या वर्षांमध्ये जत्राने महाराष्ट्रातल्या तमाम प्रेक्षकांना अगणित वेळा हसवलं आहे.. त्याच्या गाण्यांनी कैक कार्यक्रम आणि डी जे पार्टीज रंगवल्या आहेत.. कित्येकांच्या आयुष्याचा भाग बनलेला जत्रा आमच्याही आयुष्याचा अविभाज्य भाग आहे.. सध्या महाराष्ट्र शाहीर सिनेमाच्या शूटिंगसाठी साताऱ्यात गेलेलो असताना पुन्हा एकदा त्याच ठिकाणांना भेट दिली जिथे जत्रा शूट झाला होता.. आणि कित्येक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.. आता सगळं बदललं आहे पण अजून आपली जत्रा तशीच आहे!!!!

हा केवळ व्हिडिओ नाही तर असंख्य आठवणींचा खजिना आहे. आणि 'जत्रा 2' लवकरच येणार याचे हे संकेत आहेत. या व्हिडिओ मधील बदललेले रस्ते, बदललेली शाळा, गाव यांनी 17 वर्षांपूर्वी असलेलं गाव पाहून नेटकऱ्यांच्याही आठवणी ताज्या झाल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Satara Lok Sabha : उदयनराजेंनी आधी घड्याळाकडं पाहिलं अन् बरोबर 7 वाजून 7 मिनिटांनी केलं मतदान

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

SCROLL FOR NEXT