Manu James: Esakal
मनोरंजन

Manu James: साउथ इंडस्ट्रीला आणखी एक धक्का! चित्रपट निर्मात्याचा मृत्यू..

सकाळ डिजिटल टीम

साऊथ इंडस्ट्रीतुन एक दु:खद बातमी समोर आली आहे. केरळमधील तरुण चित्रपट निर्माते जोसेफ मनू जेम्स यांचे २४ फेब्रुवारी रोजी निधन झाले.

एर्नाकुलम जिल्ह्यातील अलुवा येथील रुग्णालयात 31 वर्षीय त्याने अखेरचा श्वास घेतला. जोसेफला राजागिरी रुग्णालयात आणण्यात दाखल करण्यात आलं, तेथे त्याला न्यूमोनिया झाल्याचं निदान झाले. त्याच्या जाण्याने संपूर्ण साउथ फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला आहे.

जोसेफ मनू जेम्स चित्रपट निर्माता म्हणून पदार्पण करणार होते. त्याचा पहिला चित्रपट नॅन्सी राणी रिलीजसाठी सज्ज झाला होता. या चित्रपटात अहाना कृष्णा आणि अर्जुन अशोकन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. मात्र त्याचं हे स्वप्न अपुर्णच राहिलं. ही बातमी ऐकल्यानंतर कलाकारांना मोठा धक्का बसला आहे.

जेम्स मनू 2004 मध्ये अभिनेता म्हणून करिअरची केली होती. 'नॅन्सी रानी' या चित्रपटातून दिग्दर्शनाच्या जगात पाऊल ठेवणार होता. त्याचा चित्रपट पोस्ट-प्रॉडक्शनमध्ये होता.

त्यान फार कमी वेळात कन्नड आणि मल्याळम चित्रपट उद्योगात स्वत:चे स्थान निर्माण केले होते, जेम्स मनूने बालकलाकार म्हणून पदार्पण केल्यानंतर सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले. जेम्स यांच्यावर रविवार, २६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता मेजर आर्चीपिस्कोपल मार्थ मेरी आर्चडेकॉन चर्च, कुरविलंगड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Impact: पेट्रोल-डिझेल महागलं… आता होम लोन आणि EMI वरही बसणार मोठा फटका!

IAS पद्मा जयस्वाल कोण? २३ वर्षे सेवेनंतर बडतर्फ, राष्ट्रपतींनी कारवाईला दिली मंजुरी

MI च्या इतिहासातील एक पर्व संपलं! १६ वर्षांपासून संघासोबत असलेल्या दिग्गजाने, MI ला ठोकला रामराम

Gold Rate Today: सोन्या-चांदीत मोठी घसरण! सोनं 11 हजार तर चांदी 30 हजारांनी स्वस्त; काय आहे ताजा भाव?

२-३ वर्षे तयारी, लाखो रुपये खर्च; पेपरफुटीने NEET परीक्षा रद्द, ३ विद्यार्थ्यांनी संपवलं आयुष्य

SCROLL FOR NEXT