Ketaki Chitale  
मनोरंजन

Ketaki Chitale : राहुल गांधींवर कारवाई अन् शरद पवार प्रकरण! केतकी म्हणते, "या लॉजिकने लोक..."

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व संपुष्टात आल्यापासून देशात राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये शाब्दिय युद्ध छेळले आहे. काँग्रेस सातत्याने भाजपवर हल्लाबोल करत आहे. गुरुवारी सुरत न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवले आणि त्यांना दोन वर्षांची शिक्षाही सुनावली.

मात्र, सुनावणीदरम्यानच न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. मात्र लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधींची खासदारकी रद्द केली. यावर आता अभिनेत्री केतकी चितळेने देखील भाष्य केले आहे.

राहुल गांधी यांच्यावर कारवाई झाल्यानंतर केतकी चितळेने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. यामध्ये तिने राहुल गांधी यांच्यावर झालेली कारवाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासंदर्भात फेसबुकवर शेअर केलील्या पोस्टमुळे तिच्यावर झालेली कारवाई, या दोन गोष्टींचा संदर्भ जोडला आहे.

काही लोकांच्या मते राहुल गांधी यांना घाबरले म्हणून मानहानीचा खटला दाखल केला. या लॉजिकने लोक मलाही घाबरले होते का,?, असा प्रश्न केतकी चितळेने उपस्थित केला आहे.

Ketaki Chitale story

केतकी चितळे सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केल्यामुळे तिला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. केतकीने केलेल्या पोस्टमध्ये "ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतोय नरक" असे शब्द वापरले होते, या आक्षेपार्ह पोस्टनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली होती.

या प्रकरणात केतकीला तुरूंगात देखील जावे लागले होते. मराठी मनोरंजन विश्वामध्ये नेहमीच आपल्या परखड आणि आक्रमक स्वभावामुळे आणि वादग्रस्त वक्तव्यामुळे केतकी चितळे चर्चेत असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT