ketaki mategaonkar, ketaki mategaonkar new movie, meera marathi movie SAKAL
मनोरंजन

Ketaki Mategaonkar: प्रेमाचं वेड लावणारी केतकी ८ वर्षांनी करतेय कमबॅक, नव्या सिनेमाची घोषणा

२०१५ ला आलेल्या टाईमपास २ सिनेमानंतर केतकीचा कोणताही नवा सिनेमा आला नाही.

Devendra Jadhav

Ketaki Mategaonkar New Movie: संपूर्ण महाराष्ट्राला प्रेमाचे वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे केतकी माटेगावकर. केतकी अनेक वर्षांपासून मराठी इंडस्ट्रीतून गायब होती. २०१५ ला आलेल्या टाईमपास २ सिनेमानंतर केतकीचा कोणताही नवा सिनेमा आला नाही. केतकीचे चाहते तिच्या नव्या सिनेमाची वाट बघत होते. अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. नवीन वर्षात केतकीने तिच्या आगामी सिनेमाची घोषणा केलीय.

केतकी माटेगावकर 'मीरा' या आगामी मराठी सिनेमात झळकणार आहे. नुकतीच केतकीने तिच्या सोशल मीडियावर मीरा सिनेमाला क्लॅप देतानाचा व्हिडिओ पोस्ट केलाय. या व्हिडिओत केतकी एकदम आनंदात दिसत आहे. आणि नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात, माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी असं कॅप्शन देऊन केतकीने तिच्या नव्या सिनेमाविषयी सांगितलं आहे. केदार दिवेकर या नवीन सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.

केतकी माटेगावकर तिच्या अभिनयाने आणि गायनाने गेली अनेक वर्ष मराठी इंडस्ट्री गाजवत आहे. सा रे ग म प लिटिल चॅम्प्स च्या माध्यमातून केतकीने अगदी लहान वयात तिच्या सुरांची जादू दाखवली. पुढे केतकीने सुजय डहाके यांच्या 'शाळा' सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. शाळा या पहिल्याच सिनेमातून केतकीने उत्कृष्ट काम करत सर्वांना तिची दाखल घ्यायला लावली.

शाळा नंतर केतकीच्या अभिनयाची गाडी सुसाट सुरू झाली. तिने मागे वळून पाहिले नाही. शाळा नंतर केतकीने 'काकस्पर्श', 'तानी' अशा सिनेमांमध्ये काम केले. पण केतकीला खरी ओळख आणि प्रसिद्धी मिळाली 'टाईमपास' सिनेमातून. प्रथमेश परब सोबत केतकीची जोडी जमली. आणि पुढे दोघांच्या जोडीने बॉक्स ऑफिसवर एकच धिंगाणा घातला. टाईमपास नंतर टाईमपास २ मध्ये सुद्धा केतकीच्या अभिनयाची झलक दिसली. आता मीरा सिनेमाच्या निमित्ताने केतकी ८ वर्षानंतर मराठी इंडस्ट्रीत कमबॅक करतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED action on Sahara Group : सहारा ग्रुपवर 'ED'ची मोठी कारवाई; कोट्यवधींच्या घोटाळ्यात आरोपपत्र दाखल

Ganpati Visarjan 2025 Live Updates : 1935 पासून हरिनामाच्या गजरात निघते सार्वजनिक गणपतीची बैलगाडीतून मिरवणूक

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवात 'चिकमोत्याची माळ' गाण्यावर थिरकली तरुणाई; सोशल मीडियावर रील्सना प्रचंड प्रतिसाद

Viral Video: भक्तीची ताकद की गणरायाचा चमत्कार? पाण्याचा मोठा प्रवाह, तरीही विसर्जनावेळी मूर्ती वाहून गेलीच नाही, पाहा व्हिडिओ

अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला मराठी कलाकारांनी घेतले शामनगरच्या राजाचे दर्शन

SCROLL FOR NEXT