KGF2 esakal
मनोरंजन

KGF Chapter 2: याला म्हणतात क्रेझ!, बारा तासांत पाच हजार तिकिटांचं बुकींग

टॉलीवूडचा बहुचर्चित अशा केजीएफच्या पहिल्या भागाला (KGF 2) प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.

युगंधर ताजणे

Entertainment News: टॉलीवूडचा बहुचर्चित अशा केजीएफच्या पहिल्या भागाला (KGF 2) प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या तीन वर्षांपासून चाहते आणि प्रेक्षक केजीएफच्या दुसऱ्या भागाची चातकाप्रमाणे वाट पाहत होते. येत्या आठवड्यात हा (Tollywood Movies) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या ट्रेलरलाच (Viral Trailer) मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादाविषयी चर्चा सुरु झाली होती. ट्रेलरला दोन कोटींहून अधिक व्ह्युज (Bollywood Movies) मिळाले होते. आता त्याच्या तिकिट बुकींगची चर्चा सुरु झाली आहे. गेल्या बारा तासांत पाच हजार तिकिटं विकली गेली आहे.

केजीएफ 2 हा प्रदर्शनापूर्वीच जोरदार कमाई करत असल्याचे दिसून आले आहे. येत्या काळात हा चित्रपट बंपर कमाई करणार असे अनेक तज्ञांनी सांगितलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासुन केजीएफच्या नावाची मोठ्या प्रमाणवर चर्चा आहे. चित्रपटाच्या प्री बुकींगला सुरुवात झाली आहे. आतापर्यत बारा तासांत पाच हजाराहून अधिक तिकिटं विकली गेली आहेत. केजीएफचा पहिला भाग हा 2018 मध्ये आला होता. कोरोनाचा मोठा फटका केजीएफला बसला होता. अखेर प्रशांत नीलद्वारा दिग्दर्शित केजीएफचा दुसरा भाग 14 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. दुसऱ्या भागामध्ये अभिनेत्री रवीना टंडन, संजय दत्त, यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट कन्नड, तेलुगू, हिंदी, मल्याळम आणि तमिळमध्ये प्रदर्शित होणार आहे.

KGF Movie

केवळ भारतातच नाहीतर जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये देखील केजीएफची मोठी क्रेझ आहे. त्याची चाहते मोठ्या आतुरतेनं वाट पाहत आहेत. मीडियातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट विक्रमी कमाई करेल. असा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला आहे. केजीएफ 2 हा टॉलीवूडचा पहिला चित्रपट आहे जो ग्रीसमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deccan Queen Heritage Coach : मुंबई-पुणे 'डेक्कन क्वीन' नव्या हेरिटेज लूकमध्ये; चहा, नाष्टा, डायनिंग ट्रेनचा अनुभव खतरनाक

Oman Coast Incident : ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर मोठा हल्ला, १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

'तू का आला नाहीस?' असं म्हणत न जन्मलेल्या बाळाला पत्रं लिहायच्या ओम पुरी यांच्या पहिल्या पत्नी, बसलेला मानसिक धक्का

Latest Marathi News Update : सिडकोच्या घराची प्रतीक्षा सोडतीची

Mumbai Pune Journey : कोण कोणाच्या गळाला लागणार? विश्वजित कदमांची भाजपसोबतची जवळीक पुन्हा चर्चेत; मुख्यमंत्र्यांसोबतच्या मुंबई ते पुणे प्रवासाने रंगल्या चर्चा

SCROLL FOR NEXT