KGF Chapter 2 Box Office Collection Google
मनोरंजन

KGF Chapter 2: पहिल्याच दिवशी बंपर कमाई; 'बाहुबली 2' चा तोडला रेकॉर्ड

कोरोना निर्बंधामुळे प्रदर्शन लांबणीवर पडलेल्या KGF Chapter 2 सिनेमाची प्रेक्षक चातकासारखी वाट पाहत होते.

प्रणाली मोरे

दक्षिणेच्या सिनेमांचा दबदबा गेल्या काही दिवसांत भारतभरात भलताच दिसून येत आहे. अल्लू अर्जुनच्या(Allu Arjun) पुष्पा-द राइज सिनेमानं याची मुहूर्तमेढ रोवली अन् मग काय दक्षिणेकडचे सिनेमे ऐकायला तयार नाही. तोच विजयी झेंडा हातात घेऊन राजामौलींच्या(Rajamouli) RRR नं ही घोडदौड पुढे कायम ठेवून जगभरात १००० करोडपेक्षा कमाई केली. आणि आता KGF Chapter 2 सिनेमानं पुन्हा एकदा हे सिद्ध करून दाखवलं की दक्षिणेकडचे सिनेमे आता कोणाचंच ऐकणार नाहीत,ना मागे वळून पाहणार. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्याचं त्यांनी जणू ठरवलंच आहे. आपल्या हातात आलेली सत्त कोणाकडे जाऊ द्यायची नाही याचा जणू निश्चयच केलाय या दक्षिणेकडच्या सिनेमांनी. आता कालच १४ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या KGF Chapter 2 या सिनेमानं पहिल्याच दिवशी बॉक्सऑफिस कलेक्शनवर केलेल्या कमाईनं जणू वरचं लिहिलंय ते सगळं सिद्ध करुन दाखवलं पुन्हा एकदा.

KGF Chapter 2 या सिनेमात कन्नड सुपरस्टार यशनं मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. या सिनेमानं पहिल्याच दिवशी बॉक्सऑफिस कलेक्शनचे आतापर्यंतच्या सिनेमाच्या कमाईचे सगळे रेकॉर्ड तोडले आहेत. सिनेमानं पहिल्याच दिवशी ५३.९५ करोडची कमाई केली आहे. आतापर्यंत भारतात जेवढे सिनेमे प्रदर्शित झाले त्यांच्या पहिल्या दिवशीच्या कमाईच्या तुलनेत kGF Chapter 2 ने सगळे रेकॉर्ड तोडत कमाई केल्याचं बोललं जात आहे. सिनेमानं हृतिक रोशनचा वॉर आणि अमिताभ-आमिरच्या ठग्ज ऑफ हिंदुस्थान चा देखील पहिल्या दिवशीच्या कमाईचा रेकॉर्ड तोडला आहे.

सुपरस्टार यश चा हा kGF Chapter 2 सिनेमा १२०१८ सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमानं प्रदर्शनानंतर लोकांवर जादू करण्यास सुरुवात केली आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनाची गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना प्रतिक्षा होती. पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि निर्बंध यामुळे या सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकललं गेलं. आता सिनेमा अखेर सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे आणि आपली कमाल दाखवायला सुरुवातही सिनेमानं केली आहे.

प्रशांत नील दिग्दर्शित kGF Chapter 2 हा सिनेमा देश-विदेशात १० हजार पेक्षा अधिक स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे. कन्नड,तेलुगु,हिंदी,तामिळ,मल्याळम भाषांमध्ये सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे. सुपरस्टार यश व्यतिरिक्त या सिनेमात संजय दत्त(Sanjay Dutt),रविना टंडन,प्रकाश राज, मालविका अविनाश,श्रीनिधी शेट्टी असे कलाकार या सिनेमात दिसणार आहेत. संजय दत्तनं बॉलीवूडमध्ये स्टार म्हणून नाव कमावल्यानंतर वयाच्या साठीत आता कन्नड सिनेमातनं आपलं दमदार पदार्पण केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Farmers Protest: ''जेवढी ताकद आहे तेवढी वापरा..'' कोर्टाने दिलेली वेळ संपल्यानंतर बच्चू कडूंची भूमिका

Latest Marathi News Live Update : आम्हाला अटक करावीच लागणार - कडू

अखेर अभिनेत्री संस्कृती बालगुडेच्या कृष्ण रूपाच रहस्य समोर; का घेतलेलं अभिनेत्रीने श्रीकृष्णाचं रूप?

Heart Health Tips: हृदय राहील कायम निरोगी, फक्त जीवनशैलीत करा हे ५ छोटे बदल!

काही असतात सल्लागार तर काहींकडे भविष्य जाणण्याची ताकद ! जन्मनक्षत्रानुसार जाणून घ्या तुमचं Hidden Talent (भाग 1)

SCROLL FOR NEXT