Kiara Advani & Ashneer Grover Instagram
मनोरंजन

Kiara Advani मुळे होणार होता 'शार्क टॅंंक इंडिया'च्या अशनीर ग्रोव्हरचा घटस्फोट..काय आहे प्रकरण? एकदा वाचाच

स्वतः अशनीर ग्रोव्हर यांनी आपल्या 'दोगलापन' या पुस्कात हा घटस्फोटाचा गंभीर प्रसंग शेअर केला आहे.

प्रणाली मोरे

Kiara Advani : खंडाळ्यात पार पडलेल्या अथिया शेट्टी आणि केएल राहूल यांच्या दिमाखदार लग्न सोहळ्यानंतर आता आणखी एक बीटाऊनचं कपल लग्नबंधनात अडकणार आहे. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राचं लग्न येत्या ६ फेब्रुवारी रोजी होणार आहे,याच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला आधीपासूनच मोठ्या जोशात सुरुवात झाली आहे.

कियारा आणि सिद्धार्थ दोघं लवकरच पती-पत्नी बनून जीवनात एका नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत. पण तुम्हाला माहित आहे का शार्क टॅंक इंडियाचे परिक्षक अशनीर ग्रोव्हर यांनी एकदा मोठा खुलासा केला होता की कियारा अडवाणी मुळे त्यांचा घटस्फोट होता होता राहिलेला.

अशनीर ग्रोव्हर यांनी खुलासा केला होता की कियारा अडवाणीमुळे जवळपास माझा घटस्फोट झाल्यातच जमा होता. अशनीर ग्रोव्हर यांनी 'दोगलापन' या आपल्या पुस्तकामध्ये यासंदर्भात भाष्य केलं आहे की कियारा अडवाणीनं त्यांची पत्नी माधुरी जैन ग्रोव्हरसोबतचं त्यांचं नातं जवळपास संपवण्याचा प्रयत्न केला होता.

अशनीर ग्रोव्हरसाठी कियाराचं स्थळ आलं होतं का?

त्या पुस्तकात अशनीर यांनी आपल्या ऑफिसमधील एक मित्र आणि एक सहसंस्थापक अशा दोघांना भेटण्यासंदर्भात बातचीत केली आहे. जसं त्यांनी आपल्या त्या मित्राला त्याच्या लग्ना विषयी विचारलं तेव्हा त्या मित्रानं त्यांना एका मॅचमेकर विषयी माहिती दिली. इंडियन मॅचमेकिंग ची सीमा आंटी सारखंच काम तो मॅचमेकर त्या मित्रासाठी करायचा.

इंट्रेस्टिंग गोष्ट ही आहे की जेव्हा ग्रोव्हरनी त्या मॅचमेकरला पुढच्या त्याच्या प्लॅनविषयी विचारलं तेव्हा त्यानं कियारा अडवाणीचं नाव एक परफेक्ट जोडीदार म्हणून सजेस्ट केलं.

हाच किस्सा मजेमजेत अशनीर ग्रोव्हर यांनी आपल्या आईला सांगितला होता तेव्हा ते सहज म्हणाले , ''आई आजच्या घडीला जर माझं लग्न झालं असतं तर कियारा अडवाणीचं स्थळ माझ्या मित्राप्रमाणे मला देखील आलं असतं.. असो हे सगळं मजेमजेत होतं..पण या घटनेनं अशनीर ग्रोव्हर यांची पत्नी माधुरी मात्र अस्वस्थ झाल्या होत्या.

दुसऱ्याच दिवशी त्यांना मुंबईसाठी निघायचं होतं आणि पूर्ण प्रवासा दरम्यान अशनीर ग्रोव्हर यांच्या पत्नीनं त्यांच्याशी मुळीच बातचीत केली नाही.

त्यांच्या पत्नीनं नंतर विचारलं की,''तुम्हाला कियारा अडवाणी सोबत लग्न करायचं आहे का?'' आणि पुढील ३० मिनिटं अशनीर यांची पत्नी फक्त बोलत होती आणि ते ऐकत होते.

अश्नीर पुढे म्हणाले,''मी फक्त शॉक लागल्यासारखा पाहत बसलो होतो आणि हात पसरवून होतो कारण माझी पत्नी माझ्या अंगावर जे दागिने फेकत होती ते गोळा करण्याची वेळ माझ्यावर आली होती''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, 2nd T20I: 'शुभमन पहिल्याच बॉलवर आऊट, त्यानंतर मी...' सूर्यकुमार टीम इंडियाच्या पराभवानंतर काय म्हणाला?

IND vs SA: तब्बल ७ वाईड अन् १३ चेंडूंची एक ओव्हर! अर्शदीपवर प्रचंड भडकला गौतम गंभीर; Video Viral

IND vs SA, 2nd T20I: तिलक वर्मा एकटा लढला, वादळी फिफ्टीही ठोकली; पण टीम इंडिया ऑलआऊट अन् द. आफ्रिकेचा मोठा विजय

Modi hosts Dinner for NDA MPs : मोदींकडून 'NDA' खासदारांसाठी पंतप्रधान निवासस्थानी विशेष भोजनाचे आयोजन

कांदा आता प्रतिक्विंटल सरासरी १५०० रुपये! गुरुवारी सोलापूर बाजार समितीत २०९ गाड्यांची आवक; एक महिन्यात ५० कोटींची उलाढाल

SCROLL FOR NEXT