Kiara Advani Pregnancy: Esakal
मनोरंजन

Kiara Advani Pregnancy: लग्नाच्या चार महिन्यात कियारानं दिली गुडन्यूज? फोटो व्हायरल..

Vaishali Patil

Kiara Advani Pregnancy: बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सिद्धार्थ मल्होत्रा हे काही महिन्यांपुर्वीच लग्नगाठ बांधली.

आता लग्नानंतर ती पुन्हा कामावर परतली आहे. ती कार्तिक आर्यनसोबत 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटात प्रेक्षकांना दिसणार आहे.

सध्या कियारा आणि कार्तिक हे त्याच्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूप व्यस्त आहे.

शनिवारी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चित्रपटाची स्टारकास्ट बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी पिंक सिटी जयपूरला पोहोचले होते.

दरम्यान, सोशल मीडियावर कियाराचा एक फोटो व्हायरल झाला आहे. जो पाहिल्यानंतर कियाराचे चाहते खुश झाले आहेत तर काहीजण तिच्या प्रेग्नेंसीबद्दल अंदाज लावत आहेत.

या प्रमोशन दरम्यान कियाराने केशरी ब्रॅलेटसोबत मॅचिंग पॅंट आणि ब्लेझर घातला होता. ज्यात कियारा खुपच ग्लॅमरस आणि स्टायलिश दिसत होती.

तिने हा फोटो कार्तिकसोबत काढला आहे. या फोटोत दोघेही एकमेंकात गुंग झालेले दिसताय. या फोटोत दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली तर काहींनी यात तिचा बेबी बंप दिसला आहे.

या पोस्टच्या कमेंटमध्ये नेटकऱ्यांनी लिहिलं आहे की, 'कियारा प्रेग्नंट आहे का?' तर दुसऱ्याने लिहिलं की, 'आपण सर्वजण बेबी बंप पाहू शकतो, नाही का?' तर काहींनी सिद्धार्थ मल्होत्राची देखील खिल्ली उडवली आहे. या फोटोत बहुतेकांना तिचा बेबी बंप दिसत आहे.

तथापि, कियारा गर्भवती आहे की नाही. हे तर कियाराच तिच्या चाहत्यांना सांगू शकेल. कियारा आणि सिद्धार्थ यांनी 7 फेब्रुवारीला राजस्थानमध्ये लग्न केले.

कार्तिक आर्यन आणि कियारा 'भूल भुलैया'च्या यशानंतर आता 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटातुन प्रेक्षकांच मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. त्यांचा हा चित्रपट 29 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

यात कार्तिक-कियाराशिवाय सुप्रिया पाठक कपूर, गजराज राव, सिद्धार्थ रंधेरिया, अनुराधा पटेल, राजपाल यादव, निर्मित सावंत आणि शिखा तलसानिया हे देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई सुरक्षेत चौथ्‍या स्‍थानावर! ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोणत्या शहरात?

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Kolhapur News : देवीची मूर्ती मंडपात; साउंडची ईर्ष्या चौकात, पोलिसांनी काठ्यांनी मारलं तरीही बारा तासांहून अधिक काळ मंडळांनी अडवले रस्ते

Latest Marathi News Live Update: शेतकर्‍यांना आज मदतीची गरज- शरद पवार

Kolhapur Tragedy : क्लासमध्ये ओळख, मैत्रिणीला कोल्हापुरातून उचललं; पंढरपुरात ४ दिवस कोंडलं, कोकणात नेलं पण तिथून पळून गेली अन्...

SCROLL FOR NEXT