Kiara Advani  esakal
मनोरंजन

लग्नाच्या प्रश्नावर कियाराने दिलेल उत्तर पाहून सिद्धार्थ बसला धक्का

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा आडवाणी यांच्या प्रेमाची रंगली चर्चा

धनश्री ओतारी

'शेरशाह' सिनेमातील बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा आडवाणी यांची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली. यानंतर दोघेही अनेकदा एकत्र डिनरला आणि फिरायला जाताना दिसले होते. त्यानंतर दोघं एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगली. इतकेच नव्हे तर दोघे लग्न करणार असल्याचेही बोलले जात होते. अशातच कियाराने लग्नाबद्दल दिलेलं उत्तर पाहून सिद्धार्थला चांगलाच धक्का बसला.

अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. सध्या तिच्या 'भूल भुलैया 2' आणि 'जुग जुग जिओ' या चित्रपटांची बरीच चर्चा सुरु आहे. नुकतचं 'जुग जुग जिओ'ची संपूर्ण स्टारकास्ट, कियारा अडवाणी, वरुण धवन, नीतू कपूर आणि अनिल कपूर या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटला पोहोचली. चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चनंतर संपूर्ण टीमने मीडियाशी संवाद साधला, त्यादरम्यान कियाराने तिच्या लग्नाबद्दल मोठी घोषणा केली.

'जुग जुग जिओ' चित्रपटाची कथा लग्न आणि घटस्फोटाभोवती फिरते, त्यामुळे ट्रेलर लॉन्चदरम्यान कलाकारांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारण्यात आले. दरम्यान, कियाराला स्थायिक होण्याच्या आणि लग्न करण्याच्या निर्णयाबद्दल विचारण्यात आले.

कियाराने उत्तर देताना सांगितले की, "मी लग्नाशिवायही व्यवस्थित राहू शकते, माझी जबाबदारी मी स्वतः घेऊ आहे, मी काम करत आहे, कमावते आहे आणि खूप आनंदी आहे." असे उत्तर कियाराने दिलं.

गेल्या काही दिवसांपासून सिद्धार्थ आणि कियारामध्ये सर्व काही ठीक नसल्याच्या बातम्या येत आहेत. दोघांमध्ये काय नक्की काय बिनसलं याचा खुलासा अद्याप झालेला नाही. असंदेखील म्हटलं जातं की, दोघं लवकरच लग्न बंधनात अडकण्याचा विचार करत होते, परंतु त्याआधीच त्यांच्या विभक्त झाल्याची बातमी समोर आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजय सत्तेपासून दूर राहिला तर कोण मारणार बाजी? स्टालिन फिरवू शकतात गेम, तर राज्यपालांकडे शेवटचा पर्याय

llegal Mining Crackdown: धावत्या जेसीबीला लटकून ३ किमी पाठलाग; नायब तहसीलदारांची धाडसी कारवाई

विराटचा एकेकाळचा टीममेट, पंजाब किंग्जच्या माजी क्रिकेटरचं वयाच्या ३६व्या वर्षी निधन; युवराज म्हणाला, त्याच्यासोबत ड्रेसिंग रूम...

Crime: धक्कादायक! क्षुल्लक कारणावरून पत्नीसोबत वाजलं; रागाच्या भरात पतीनं स्वत:चं गुप्तांग कापलं, नेमकं प्रकरण काय?

Nanded Accident : रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक; सेवानिवृत्त सहकार अधिकारी राजेश उल्लेवार यांचे निधन

SCROLL FOR NEXT